Sayaji Shinde : धक्कादायक! सयाजी शिंदेंवर मधमाशांचा हल्ला

  • Written By: Published:
Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 03 14T113629.668

Honey Bee Attack On Actor Sayaji Shinde : अभिनेते सयाजी शिंदे हे अभिनयासोबतच आपल्या सामाजिक कामासाठीदेखील ओळखले जातात. सयाजी यांनी अनेक हिंदी व मराठी सिनेमामध्ये काम केले आहे. परंतु त्यांना स्टारडम हे साऊथ इंडस्ट्रीतील सिनेमांमध्ये काम केल्याने मिळाले. परंतु अभिनयासोबतच  ते पर्यावरण क्षेत्रामध्ये देखील सामाजिक काम करत असतात. असेच एके ठिकाणी कामानिमित्त गेले असता त्यांच्यावर मधमाशांनी हल्ला केला आहे.

सध्या पुणे ते बंगळूर या महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम सुरु आहे. त्यामुळे या रस्त्यावरील झाडे पाडली जावू नये व त्यांची व्यवस्थित काळजी घेतली जावी म्हणून ते स्वत: तासवडे याठिकाणी उपस्थित आहेत. नेमके याच वेळी त्यांच्यावर मधमाशांनी हल्ला केला आहे. अद्याप त्यांची तब्येत कशी आहे ते कळू शकलेले नाही.

मद्यधुंद अवस्थेत अमिताभ बच्चन यांना भेटायला गेला कपिल शर्मा, मग बच्चन यांनी….

सयाजी शिंदे हे कायम पर्यावरणाच्या कामासाठी अग्रस्थानी असतात. झाडे जिवंत रहावी, जंगल तोड होऊ नये, पर्यावरणाचा समतोल रहावा यासाठी त्यांनी संपूर्ण महाराष्ट्र पालथा घातला आहे. नेमके असेच काम करत असताना त्यांच्यावर हा हल्ला करण्यात आला आहे.

झाडे तोडू नये यासाठी ते स्वत: पुणे-बंगळूरु  महामार्गावरील तासवडे येथे उपस्थित होते. महामार्ग रुंदीकरणादरम्यान जी झाडे मोडतोड होण्यापासून वाचली आहेत, त्यांचे शास्त्रीय पद्धतीने पुनर्रोपन केले पाहिजे, अशी भूमिका त्यांनी घेतली होती.

मद्यधुंद अवस्थेत अमिताभ बच्चन यांना भेटायला गेला कपिल शर्मा, मग बच्चन यांनी….

दरम्यान, सयाजी यांनी आपल्या अभिनयाच्या माध्यमातून महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. सयाजी यांनी मराठी व हिंदी पेक्षा दाक्षिणात्य सिनेमांमध्ये अधिक काम केले आहे. त्यामुळे त्यांचे जेवढे चाहते महाराष्ट्रात आहेत, त्यापेक्षा अधिक चाहते हे साऊथमध्ये आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube