“मी स्वतः बरखाची फॅन आहे!” – सई ताम्हणकरचा ‘मटका किंग’मधील भूमिकेवर खुलासा
Sai Tamhankar नेहमीच अशा महिला पात्रांकडे आकर्षित झाल्या आहेत प्राइम व्हिडिओवरील ‘मटका किंग’मधील बरखा अगदी तशीच आहे.
I am a fan of Barkha! Sai Tamhankar reveals about her role in ‘Matka King’ : सई ताम्हणकर या नेहमीच अशा महिला पात्रांकडे आकर्षित झाल्या आहेत ज्यांच्यात एक जिद्द असते, स्वतःचा आवाज असतो आणि स्वतःची ओळख निर्माण करण्याची ताकद असते. प्राइम व्हिडिओवरील ‘मटका किंग’मधील बरखा अगदी तशीच आहे. अतिशय स्वतंत्र विचारांची, स्वतःबद्दल जागरूक आणि स्वतःच्या अटींवर आयुष्य जगणारी बरखा ही कथा वाचताच सईंच्या मनात घर करून गेली. एका कलाकारासाठी जो नेहमीच सखोल भूमिकांच्या शोधात असतो, हा रोल खूप वेगळा ठरला. येथे सई त्या पात्राबद्दल मनमोकळेपणाने बोलत आहेत, ज्याने त्यांना अक्षरशः वेड लावले.
आपल्या पात्राबद्दल सांगताना सई म्हणाल्या, “ती एक जिद्दी महिला आहे. साधारणपणे जेव्हा तुम्ही एखाद्याच्या पत्नीची भूमिका करता, तेव्हा एक समज तयार होतो की ‘अरे, ही फक्त पत्नी आहे.’ पण या महिलेची स्वतःची एक दुनिया आहे, स्वतःचा आवाज आहे आणि ती तो आवाज वापरतेही—हे मला खूप भावले. ती आपल्या पतीच्या लोकप्रियतेखाली, ग्लॅमरखाली किंवा पैशांच्या दडपणाखाली दबलेली नाही. तिची स्वतःची विचारसरणी आहे, स्वतःची वेगळी ओळख आहे, जी ती जपते—हे खूप खास आहे. मला खंबीर महिलांचे पात्र आवडतात आणि बरखा तशीच आहे.”
रमेश चौधरी यांच्या शैलीतून उलगडणार ‘सालबर्डी’ चा थरार
सई यांनी पुढे सांगितले की, त्या स्वतःच आपल्या पात्राच्या फॅन कशा झाल्या: “सुरुवातीला ती विजय वर्मा यांनी साकारलेल्या ब्रिज भट्टीच्या ग्लॅमर, लोकप्रियता आणि पैशांकडे आकर्षित होते. पण नंतर हळूहळू, या सगळ्या चमकधमककडे पाहून ती स्वतःचा मार्ग शोधते. बरखाचा प्रवास हा बाहेरून सुरू होतो आणि स्वतःच्या शोधापर्यंत पोहोचतो. हा प्रवास खूप रंजक आहे. माझ्यासाठी सर्वात महत्त्वाचे म्हणजे या प्रवासात तिचा व्यक्ती म्हणून होणारा विकास, आणि तिच्यातील बदल खरोखरच खूप रोचक आहे. मी बरखाची फॅन आहे.”
ही सिरीजअभय कोराने यांनी निर्मित व लिखित केली असून नागराज पोपटराव मंजुळे यांनी दिग्दर्शित व लिखित केली आहे. यात विजय वर्मा, कृतिका कामरा , सई ताम्हणकर , सिद्धार्थ जाधव, भूपेंद्र जादावत आणि गुलशन ग्रोवर मुख्य भूमिकेत आहेत. तसेच इतर कलाकारांमध्ये भरत जाधव, गिरीश कुलकर्णी, जेमी लीवर, किशोर कदम, सायरस साहूकार, अर्पिता सेठिया, संभाजी तांगडे, इश्तियाक खान, संजीव जोटांगिया आणि सिमरन अश्विनी यांचा समावेश आहे. ‘मटका किंग’ ही सिरीज 17 एप्रिल रोजी भारतासह जगभरातील 240 देश आणि प्रदेशांमध्ये प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित होणार आहे.