आईसोबत लोकांना हसवणारा प्रथमेश कदमचा वयाच्या 26 व्या वर्षी निधन, कारण काय?

Prathamesh Kadam Death : सोशल मीडियावर अगदी कमी वेळेत आपली एक वेगळी ओळख निर्माण करणारा मराठी कंटेंट क्रिएटर प्रथमेश कदमचे

  • Written By: Published:
Prathamesh Kadam Death

Prathamesh Kadam Death : सोशल मीडियावर अगदी कमी वेळेत आपली एक वेगळी ओळख निर्माण करणारा मराठी कंटेंट क्रिएटर प्रथमेश कदमचे वयाच्या 26 व्या वर्षी निधन झाले आहे. त्याने घेतलेल्या अचानक एक्टिझमुळे चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. प्रथमेशच्या निधनाची माहिती त्यांचे जवळचे मित्र आणि कंटेंट क्रिएटर तन्मय चंद्रमोहन पाटेकरने दिली आहे. तन्मय यांनी प्रथमेशसोबतचा एक फोटो इंस्टाग्रामवर शेअर करत भावुक पोस्ट शेअर करत ही माहिती दिली.

तन्मयने या पोस्टमध्ये लिहिले आहे की, प्रथमेश, आम्हाला तुमची नेहमीच आठवण येईल. तिथेही स्वतःची काळजी घ्या! भाऊ, आम्हाला तुमची खूप आठवण येईल. या पोस्टमुळे सोशल मीडियावर दुःखाची लाट पसरली. तर दुसरीकडे प्रथमेशच्या निधनाचे नेमकं कारण काय? याबाबत सध्या सोशल मीडियावर अनेक चर्चांना उधाण आले आहे. तर प्रथमेशची (Prathamesh Kadam Death) मैत्रीण सई उतेकर (Sai Utekar) हिने सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करत निधनाचे कारण सांगितले आहे.

या व्हिडिओमध्ये तिने म्हटलं आहे की, खूप जणांचे फोन आणि मेसेजेस आले. खूप जणांना प्रश्न पडला आहे की, नक्की काय झालं? प्रथमेशला अचानक काय झालं? तो खूप हेल्दी आणि चांगला होता. सगळे स्टोरी टाकत आहे की, त्याचं निधन झालं आहे. खूप जणांना धक्का बसलाय. प्रथमेश गेल्या एका महिन्यांपासून ऍडमिट होता. त्याच्यावर उपचार सुरु होते. त्याचा पोटात इन्फेक्शन झालं होतं. पोटातील इन्फेक्शन जाण्यासाठी आणि तो पूर्णपणे बरं होण्यासाठी डॉक्टर प्रयत्न करत होते. प्रथमेशच्या घरच्यांनीही शक्य तेवढे सगळे प्रयत्न केले पण ते त्याला वाचवू शकले नाही असं तिने सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या एका व्हिडिओत म्हटलं आहे.

“आशिको की कॉलनी” मध्ये शाहिद कपूर आणि दिशा पटानी यांचा हटके अंदाज

आई-मुलाची जोडी

सोशल मीडियावर प्रथमेश मराठी कंटेंट क्रिएटरसह आईशी असलेल्या त्याच्या मजबूत नात्यासाठी देखील ओळखला जात होता. वडिलांच्या निधनानंतर प्रथमेशने घराची जबाबदारी सांभाळली होती. तो आईसोबत कॉमेडी आणि इतर विषयांवर व्हिडिओ बनवत होता. प्रथमेशचे इंस्टाग्रामवर 186,000 फॉलोअर्स होते.  त्याच्या साधेपणा आणि कंटेंट निर्मितीच्या अनोख्या भारतीय शैलीमुळे तो फार कमी वेळात क्रिएटर इकोसिस्टममध्ये एक चमकणारा तारा बनला.

follow us