तब्बल 26 वर्षांनी भ्रष्टाचाराशी दोन हात करणार कमल हासन; ‘इंडियन 2’चा धमाकेदार टीझर प्रदर्शित

तब्बल 26 वर्षांनी भ्रष्टाचाराशी दोन हात करणार कमल हासन; ‘इंडियन 2’चा धमाकेदार टीझर प्रदर्शित

Kamal Haasan Indian 2 Intro Release:  दाक्षिणात्य सुपरस्टार कमल हासन (Kamal Haasan) गेल्या काही दिवसांपासून ‘इंडियन 2’ (Indian 2) या सिनेमामुळे जोरदार चर्चेत आला आहे. लवकरच हा सिनेमा चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. आता या बहुचर्चित सिनेमाची उत्सुकता लक्षात घेता सिनेमाच्या निर्मात्यांनी ‘इंडियन 2’ या (Indian 2 Movie) सिनेमाचा इंट्रो व्हिडिओ प्रदर्शित करण्यात आला आहे.

कमल हासन आणि शंकर यांचा ‘इंडियन 2’ हा सिनेमा 3 नोव्हेंबर 2023 दिवशी सिनेमागृहात प्रदर्शित करण्यात येणार आहे. या सिनेमाची प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता लागली आहे. ‘इंडियन 2’च्या निर्मात्यांनी एक ट्वीट शेअर करत सांगितले आहे की, ‘इंडियन 2’साठी सज्ज व्हा..3 नोव्हेंबर दिवशी सिनेमा होणार प्रदर्शित..’इंडियन 2’ची (Indian 2 Movie) सिनेमाचा इंट्रो व्हिडिओ प्रदर्शित करण्यात आला आहे.

‘इंडियन 2’च्या पोस्टरमध्ये कमल हसन बघायला मिळत आहेत. कमल हासन यांचा 7 नोव्हेंबर दिवशी वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त ‘इंडियन 2’ हा सिनेमा 3 नोव्हेंबर दिवशी प्रदर्शित करण्यात येणार आहे. कमल हासनचा ‘इंडियन 2’ हा सिनेमा 1996 मध्ये आलेल्या ‘इंडियन’ या सिनेमाचा सीक्वेल असणार आहे. या सिनेमामध्ये ते स्वातंत्र्य सैनिकाच्या भूमिकेमध्ये बघायला मिळणार आहेत. या सिनेमात देखील भ्रष्टाचाराविरुद्ध लढताना ते बघायला मिळणार आहे.

Kamal Haasan: कमल हासनच्या ‘इंडियन 2’ची झलक पाहिलीत का? ‘या’ भूमिकेत झळकणार सुपरस्टार

‘इंडियन 2’ या सिनेमामध्ये कमल हासन यांच्यासह नयनतारा मुख्य भूमिकेमध्ये बघायला मिळणार आहे. तसेच रकुल प्रीत सिंह, प्रिया भवानी शंकर आणि सिद्धार्थही या सिनेमामध्ये मुख्य भूमिकेत बघायला मिळणार आहे. एस. शंकर यांनी या सिनेमाच्या दिग्दर्शनाची यावेळी धुरा सांभाळली आहे.

कमल हासनचा ‘विक्रम’ (Vikram) हा सिनेमा गेल्या काही महिन्यापासून चाहत्यांच्या भेटीला आला होता. बॉक्स ऑफिसवर या सिनेमाने मोठा गल्ला कमावला होता. रेकॉर्डब्रेक कमाईसह या सिनेमातील कमल हासनच्या कामाचं खूप कौतुक करण्यात आला होता. आता पुन्हा एकदा कमल हासन रुपेरी पडदा गाजवण्यासाठी पुन्हा सज्ज झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ‘इंडियन 2’ या सिनेमाचे ओटीटी राइट्स नेटफ्लिक्सने 200 कोटींमध्ये विकत घेतल्याचे समोर आले आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube