Download App

Kanhaiya Twitter Pe Aaja : विकी कौशलच्या स्टायलिश भजन कुमारचं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला; ‘या’ दिवशी येणार चित्रपट

Kanhaiya Twitter Pe Aaja : ‘कन्हैया ट्विटर पे आजा’ (Kanhaiya Twitter Pe Aaja) हे अभिनेता विकी कौशलवर चित्रित झालेलं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. हे गाणं यशराज फिल्मच्या आगामी चित्रपटातील आहे. या चित्रपटाचं नाव ‘द ग्रेट इंडियन फॅमिली’ असं आहे. त्यातील ‘कन्हैया ट्विटर पे आजा’ हे अभिनेता विकी कौशलवर चित्रित झालेलं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. तर चाहते देखील विकीच्या या भजन गातानाच्या लूकवर फिदा झाले आहेत.

8 हजार भगिनींनी राखी बांधताच आमदार बेनकेंनी दिला शब्द, ‘हा भाऊ तुमच्या…’

रक्षाबंधन रक्षाबंधन या सणाला संपूर्ण भारत भरात विशेष महत्त्व आहे. त्यामुळे आज सर्वत्र भावा-बहिणीच्या या सणासाठी लगबग पाहायाला मिळत आहे. उत्साहाचे वातावरण आहे. त्यात आज ‘कन्हैया ट्विटर पे आजा’ (Kanhaiya Twitter Pe Aaja) या चित्रपटाचं पहिलं गाणं रिलीज करत चित्रपटाच्या निर्मात्यांनी चाहत्यांना सरप्राईज दिलं आहे. तसेच या अभिनेता विकी कौशलचा चित्रपटातील लूक देखील समोर आला आहे.

Wadhawan बंधूंवर मेहेरबान झालेल्या पोलिसांना दणका : एका अधिकाऱ्यासह 7 जणांवर मोठी कारवाई

भजन गाताना दिसला भजन कुमार…

यशराज फिल्मच्या युट्युब चॅनलवर हे गाणं रिलीज करण्यात आलं आहे. या ‘कन्हैया ट्विटर पे आजा’ (Kanhaiya Twitter Pe Aaja) मध्ये विकी कौशल भजन कुमार म्हणून भूमिका साकारात आहे हे स्पषट होत आहे. तो यामध्ये स्टेजवर नाचताना दाखवला आहे. तर तो गाताना देखील दाखवण्यात आलं आहे. कारण तो या चित्रपटामध्ये एक स्थानिक गायक दाखवण्यात आला आहे. त्यामुळे लोक त्याला या रोलमध्ये पाहण्यासाठी उत्सुक झाले आहेत.

यावेळी आपल्या या भूमिकेवर बोलताना विकी म्हणाला, ‘द ग्रेट इंडियन फॅमिली’ या चित्रपटामध्ये मी मजा-मस्ती केली आहे. तर ‘कन्हैया ट्विटर पे आजा’ (Kanhaiya Twitter Pe Aaja) गाण्यासह माझं कॅरेक्टर रिव्हिल केल्याने मला उत्साह वाटत आहे. तसेच लोकांना माझा हा अंदाज नक्की आवडेल.’ तसेच या गाण्याबद्दल सांगायचं झालं तर हे गाणं अमिताब भट्टाचार्यने लिहिलं तर प्रीतमने कंपोज केलं आहे. नकाश अजीजने ते गायलं आहे.

कधी येणार चित्रपट?

यशराज फिल्मच्या बॅनरखाली तयार होत असलेला हा चित्रपटाचं दिग्दर्शन हे विजय कृष्ण आचार्य यांनी केलं आहे. तसेच या चित्रपटामध्ये अभिनेता विकी कौशलसह अभिनेत्र मानुषी छिल्लर देखील मुख्य भूमिकेत असणार आहे. हा चित्रपट 22 सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Tags

follow us