Special Screening: ‘संस्कारी बहू’ कतरिनाच्या ‘त्या’ कृत्यानं जिंकली चाहत्यांची मन; व्हिडिओ व्हायरल

Special Screening: ‘संस्कारी बहू’ कतरिनाच्या ‘त्या’ कृत्यानं जिंकली चाहत्यांची मन; व्हिडिओ व्हायरल

Sam Bahadur Special Screening: विकी कौशल (Vicky Kaushal) स्टारर ‘सॅम बहादुर’ (Sam Bahadur Movie) हा चित्रपट सध्या जोरदार चर्चेत आहे. हा चित्रपट 1 डिसेंबरला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. काल रात्री मुंबईत या चित्रपटाचे स्पेशल स्क्रिनिंग (Special Screening) आयोजित करण्यात आले होते, (Social media) यामध्ये विकी आणि कतरिना कैफसोबत (Katrina Kaif) हिंदी मनोरंजनसृष्टीतील अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)


सॅम बहादूरच्या स्पेशल स्क्रिनिंगला विकीचे संपूर्ण कुटुंब हजर होते. त्याचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या जोरदार धुमाकूळ घालत आहेत. विकी कौशलला सपोर्ट करण्यासाठी त्याचे संपूर्ण कुटुंब या स्पेशल स्क्रिनिंगला पोहोचले. यावेळी कतरिनाचं सासूसोबतचे खास बॉन्डिंग पाहायला मिळाले आहे. या व्हिडिओची सोशल मीडियावर सध्या जोरदार चर्चा रंगत आहे.

व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये कतरिना कैफ तिच्या सासू आणि सासऱ्यासोबत सिनेमा हॉलमधून बाहेर पडताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये कतरिना गर्दीत तिच्या सासूचे रक्षण करताना दिसत आहे. अभिनेत्रीच्या या काळजीपोटी स्वभावाने चाहत्यांची मने जिंकली आहे. कतरिना कैफच्या ‘त्या’ कृत्यानं चाहते कौतुक करत आहेत.

‘या’ कलाकाराला ओळखलं का? ‘शेहर लखोत’ सिनेमातून प्रेक्षकांचं करणार तुफान मनोरंजन

या व्हिडीओवर सध्या कमेंट्सचा वर्षाव होत आहे. एका युजरने कमेंटमध्ये लिहिले की, ती एकमेव बॉलिवूड अभिनेत्री आहे जी परदेशी असूनही तिला कोणीही तशा प्रकारे पाहिले नाही आणि काहीतरी चुकीचे ऐकले आहे. म्हणूनच ती सर्वोत्तम सून आहे. तर दुसऱ्या एका युजरने म्हणाले की, ती किती शांत आहे… ना ड्रामा, ना ओव्हर अॅक्टिंग. सध्या बॉक्स ऑफिसवर ‘साम बहादूर’ आणि रणबीर कपूर स्टारर ‘एनिमल’ यांच्यामध्ये जोरदार स्पर्धा बघायला मिळणार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube