‘किसी का भाई किसी की जान’ ने कमावले इतके कोटी

Untitled Design   2023 04 24T222444.928

Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan: बॉलिवुडचा भाईजान सलमान खानचा सिनेमा ‘किसी का भाई किसी की जान’ हा नुकताच रिलीज झाला आहे. ईदच्या एक दिवस आधी हा सिनेमा रिलीज झाला आहे. दरम्यान या सिनेमाच्या तीन दिवसांच्या कमाईचे आकडेवारी समोर आली आहे. चित्रपटानं फर्स्ट डेला चांगली कमाई केली नाही. मात्र वीकेंडला चित्रपटाच्या कमाईत वाढ झाली आहे. जाणून घेऊयात ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर किती कलेक्शन केले आहे हे आपण पाहू.

किसी का भाई किसी की जान या चित्रपटाने रिलीज झाल्यानंतर पहिल्या दिवशी (21 एप्रिलला) 15.81 कोटींची कमाई केली. 22 एप्रिलला ‘किसी का भाई किसी की जान’ पाहण्यासाठी प्रेक्षकांनी थिएटरमध्ये गर्दी केली होती. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दुसऱ्या दिवशी 25 कोटींचं कलेक्शन केलं. तर तिसऱ्या दिवशी या सिनेमाने 26.25 कोटींची कमाई केली आहे.

भारतीय क्रिकेट संघातील ‘हे’ दोन खेळाडू अपघातातून थोडक्यात बचावले

या सिनेमाचे एकूण कलेक्शन आता 67.06 कोटी झाले आहे. तीन दिवसात या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर 50 कोटींच्या टप्पा पार केला आहे. दरम्यान शाहरुख खानचा पठाण काही दिवसांपूर्वी रिलीज झाला होता. या सिनेमाने रेकॉर्डब्रेक कमाई केली. या सिनेमाच्या पुढे सध्या तरी सलमानचा सिनेमा मागे पडला आहे. दरम्यान येत्या काळात सलमानचा हा सिनेमा किती कमाई करणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

धर्माधिकारी यांच्यासह मुख्यमंत्री – उपमुख्यमंत्र्यांवर कारवाई करा, खारघर प्रकरणी याचिका दाखल

तगडी स्टारकास्ट
या चित्रपटात सलमान आणि पूजा यांच्यासोबत शहनाज गिल, भूमिका चावला, साऊथ सुपरस्टार वेकेंटश दग्गुबाती, पलक तिवारी, सिद्धार्थ निगम, जस्सी गिल या कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारली आहे.

सलमाननं मानले चाहत्यांचे आभार
सलमानने सोशल मीडियावर स्वत:चा एक फोटो शेअर करत चाहत्यांचे आभार मानले. पोस्टमध्ये त्यानं लिहिलं, “तुमचं प्रेम आणि पाठिंब्यासाठी खूप खूप आभार… तुमचं प्रेम आणि पाठिंब्याचं मला कौतुक वाटत आहे”.

Tags

follow us