कॅप्टन भोंदू बाबाचा पर्दाफाश करणार ‘महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स’ ; मोशन पोस्टर प्रदर्शनाद्वारे चित्रपटाची घोषणा…

Maharashtra Epstein Files : समाजात घडणाऱ्या घटनांचे पडसाद कित्येकदा रुपेरी पडद्यावरही उमटतात आणि चित्रपटांच्या माध्यमातून काही अप्रकाशित

Maharashtra Epstein Files

Maharashtra Epstein Files : समाजात घडणाऱ्या घटनांचे पडसाद कित्येकदा रुपेरी पडद्यावरही उमटतात आणि चित्रपटांच्या माध्यमातून काही अप्रकाशित पैलू उजेडात येतात. आजवर समाजात घडलेल्या अनेक घटना आणि प्रकरणांवर आधारित वास्तवदर्शी चित्रपट बनले आहेत. समाजाच्या डोळ्यांत अंजन घालण्याचे काम करणाऱ्या या चित्रपटांनी सरकारी व्यवस्थांनाही धारेवर धरले आहे. नुकतीच घोषणा झालेल्या ‘महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स’ या मराठी चित्रपटातही संपूर्ण महाराष्ट्र हादरवणाऱ्या अशाच एका गाजलेल्या प्रकरणाचा पर्दाफाश करण्यात येणार आहे. मोशन पोस्टर प्रदर्शित करून ‘महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स’ या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. २ ऑक्टोबर २०२६ रोजी हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार असल्याचे मोशन पोस्टरवर घोषित करण्यात आले आहे.

सोशल मीडियावर मोशन पोस्टर प्रदर्शित करून आगामी ‘महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स‘ या मराठी चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. जैन फिल्म प्रोडक्शन आणि मातोश्री एन्टरटेन्मेंट वर्ल्ड प्रस्तुत या चित्रपटाची निर्मिती करण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी देवेंद्र भट, सुर्यकांत भुंडे आणि प्रशांत कदमपुरे यांनी स्वीकारली आहे. वास्तवदर्शी कथानकावर आधारलेल्या या चित्रपटाच्या माध्यमातून दिग्दर्शक स्वरूप बी. सावंत यांनी एक आव्हानात्पक पाऊल टाकले आहे.

‘आता सगळं उघड होणार…!’ हि टॅगलाईन हा चित्रपट अनेकांचा पर्दाफाश करणार असल्याचे संकेत देण्यासाठी पुरेशी आहे. आता हा चित्रपट कोणकोणत्या गोष्टी उघड करतो, ते प्रदर्शनानंतरच समजेल. या चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर अनेकांचे सभ्यतेचे मुखवटे आपोआप गळून पडणार आहेत. या चित्रपटात कॅप्टन भोंदू बाबाची गोष्ट पाहायला मिळणार आहे. प्रदर्शित करण्यात आलेल्या पोस्टरवर एक पाठमोरी व्यक्ती उभी असल्याचे पाहायला मिळते. या व्यक्तीने पाठीमागे घेतलेल्या हातात पाचशे रुपयांच्या नोटांची बंडल्स आहेत. याने कुर्ता-पायजमा आणि जॅकेट असा सभ्य गृहस्थांचा पोषाख परिधान केलेला आहे. त्याच्या चहूबाजूला क्राईम सीनच्या पिवळ्या फिती बांधलेल्या आहेत. त्याच्या समोरील भिंतीवरील काही फोटोंमध्ये ‘प्रश्नचिन्ह’ आहे. एकावर ‘नाशिक’ आणि दुसऱ्यावर ‘भोंदूबाबा’ असे लिहिले आहे.

समोरील टेबलवर डाव्या बाजूला तांब्याचा पाण्याचा जग आणि भांडे आहे, तर उजव्या बाजूला पुस्तके, चहाचा ग्लास आणि एलिश हनी आहे. हे सर्व चित्र पाहिल्यावर हा चित्रपट कोणत्या कॅप्टन भोंदूबाबाच्या कृत्यांचा पर्दाफाश करणार आणि कोणाची एपस्टिन फाईल ओपन करणार हे चाणाक्ष मराठी प्रेक्षकांना वेगळे सांगण्याची गरज नाही.

नीट पेपर फुटी प्रकरणात पुण्यातून आणखी एक अटक; गॉड नंबरने सेव्ह असलेल्या तेजस शहाला उचललं-

‘महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स’ चित्रपटाची कथा सध्या तरी गुलदस्त्यात असून, कलाकारांची नावेही गुप्त ठेवण्यात आली आहेत. लवकरच या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात करण्यात येणार आहे. या चित्रपटाची कथा सागर कुमार एस. जैन यांनी लिहीली असून, पटकथा व संवादलेखन संजय नवगिरे यांनी केले आहे. डिओपी आकाश काकडे या चित्रपटाची सिनेमॅटोग्राफी करणार असून, कला दिग्दर्शन अक्षय आंबेकर करणार आहेत. वेशभूषा आकांक्षा गांधी यांची असून, सचिन घणवंत या चित्रपटाचे प्रोडक्शन हेड आहेत तसेच नेहा घोडके प्रॉडकशन कंट्रोलर म्हणून काम पाहणार आहेत.

follow us