Mahesh Manjrekar: महेश मांजरेकरांचं मोठं वक्तव्य; म्हणाले, “माझा मुलगा गे रिलेशनशीपमध्ये असेल तर…

Mahesh Manjrekar: महेश मांजरेकरांचं मोठं वक्तव्य; म्हणाले, “माझा मुलगा गे रिलेशनशीपमध्ये असेल तर…

Mahesh Manjrekar About Gay Relationship: मराठी चित्रपट सृष्टीमधील बेधडक, बिनधास्त, आणि सडेतोड प्रतिउत्तर देणारे व्यक्तिमत्व म्हणजे महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar). महेश मांजरेकरांनी आजपर्यंत त्यांच्या अभिनयाने केवळ मराठी (Marathi) नाही तर हिंदीमध्ये (Hindi) देखील चाहत्यांना मनावर अधिराज्य गाजवणारे महेश मांजरेकर यांनी दिग्दर्शित केलेले पांघरुण, वास्तव, दे धक्का असे काही सिनेमे चाहत्यांना विशेष आवडले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Satya Manjrekar (@satyamanjrekar)


नुकतंच महेश मांजरेकरांची निर्मिती असलेल्या ‘एका काळेचे मणी’ (Eka Kale Che Mani web series) ही कॉमेडी सिरीज चाहत्यांना तुफान आवडल्याचे दिसून येत आहे. या सिरीजच्या निमित्ताने महेश मांजकेकरांनी त्यांच्या आणि मुलाच्या नातेसंबंधांबद्दल मोठे भाष्य केले आहे. त्यांनी दिलेल्या मुलाखतीमध्ये महेश मांजरेकरांनी एक मोठं वक्तव्य केले आहे. समजा त्यांना पुढे कळलं की त्यांचा मुलगा गे आहे तर तुम्ही काय करणार? या सवालावर मांजरेकरांनी बेधडक उत्तर दिले आहेत.

म्हणाले “ज्याची सध्या चर्चा सुरु आहे.  असा एक काळ होता, जेव्हा समाज अशा लोकांना आणि त्यांची नाती स्वीकारायला तयार नसायचा. यामुळे मोठ्या प्रमाणात आत्यहत्येच्या घटना घडल्याचे देखील आपण पाहिलं आहे. परंतु आता हे चित्र बदलत असल्याचे दिसून येत आहे. त्यांना आपण स्वीकारत आहे. समझा माझ्या मुलाने सत्याने येऊन मला सांगितलं की तो गे रिलेशनशीपमध्ये आहे, तर मी त्याचा सहज स्वीकार करणार आहे. या गोष्टीला मी आजिबात विरोध करणार नाही. कारण ती त्याची निवड आणि त्याचं स्वतः च आयुष्य असणार आहे. त्याला हवं तसं आयुष्य जगू देणार असल्याचे त्यांनी यावेळी मोठं वक्तव्य केले आहे.

Mission Impossible 7 सह सिनेमा गृहात रिलीज होणार किंग खानच्या ‘जवान’चा ट्रेलर

तसेच माझ्या मुलीने जरी हे मला असं काही सांगितलं तर तिला देखील मी तिच्या मताचा आणि आयुष्याचा आदर करणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले आहे. तसेच एका काळेचे मणी या सिरीजमध्ये पिढ्यांमधील संघर्षासोबत परंपरागत मध्यमवर्गीय मुल्यांचा अंगिकार असल्याचे दाखवण्यात आला आहे. अतूल केळकर यांनी दिग्दर्शित करण्यात आलेल्या या सिरीजची निर्मिती ही महेश मांजरेकर, ऋतुराज शिंदे आणि ऋषी मनोहर यांनी केली आहे. यामध्ये पौर्णिमा मनोहर, ऋता दुर्गुळे, समीर चौघले आणि विशाखा सुभेदार हे कलाकार महत्त्वपूर्ण भुमिकेमध्ये चाहत्यांना दिसून आले आहेत. ही सिरीज जिओ सिनेमा या ओटीटी प्लॅटफॉर्मवर उपलब्ध करण्यात आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube