Nitin Desai Death : नितीन देसाईंच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन; दिग्गजांनी लावल्या रांगा…

Nitin Desai Death : नितीन देसाईंच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन; दिग्गजांनी लावल्या रांगा…

Nitin Desai Death : सुप्रिसद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी बुधवारी कर्जत येथील एन.डी. स्टुडीओमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्यानंतर आज त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यापूर्वी त्यांच्या पार्थिव अंत्यदर्शन करण्यासाठी ठेवण्यात आलं आहे. त्यावेळी अनेक दिग्गजांनी त्यांच्या पार्थिवाचं अंत्य दर्शन घेतल्याचं पाहायाला मिळत आहे. ( Many celebrity attained Funeral of Nitin Desai )

मोठी बातमी : राहुल गांंधींना मोठा दिलासा; दोन वर्षांच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाची स्थगिती

यावेळी राजकीय, कला, चित्रपट क्षेत्रातील अनेक मान्यावरांनी त्यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतल. त्यामध्ये खासदार उदयनराजे भोसले, किरीट सोमय्या, मधुर भांडारकर, रवी जाधव. यांच्या अनेक मान्यावरांनी देसाईंचं अंत्यदर्शन घेत प्रतिक्रिया दिल्या.

भाजप-सेना युती अभेद्य…नगर मनपावर युतीचा झेंडा फडकविणार; भाजप निवडणुकीच्या तयारीला

नितीन चंद्रकांत देसाई यांना सन २००० मध्ये ‘हम दिल दे चुके सनम’साठी तर २००३ मध्ये ‘देवदास’साठी उत्कृष्ट कला दिग्दर्शक म्हणून राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले होते. मराठीतील ‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’ या सिनेमासाठी उत्कृष्ट कला दिग्दर्शक म्हणून ‘महाराष्ट्र राज्य सिनेमा पुरस्कार’ देखील त्यांना सन्मानित केले होते. प्रोडक्शन डिझायनर म्हणून ‘लगान’, जोधा-अकबर, ‘हम दिल दे छुके सनम’, ‘मिशन काश्मीर’, ‘देवदास’, ‘खाकी’, ‘स्वदेस’, प्रेम रतन धन पायोया यासारख्या सिनेमाच्या लोकप्रियतेत नितीन देसाई यांच्या कला दिग्दर्शनचा मोठा वाटा होता.

नितीन देसाई यांच्या कार्याची व्याप्ती प्रचंड आहे. मुंबईतील कर्जत जवळ त्यांनी एक भव्य स्टुडीओ उभा केला होता. ज्याद्वारे अनेक सिनेमांचे चित्रीकरण करण्यात आले आहे. त्यांच्या कलेच्या जोरावर त्यांनी संपूर्ण देशात नाव कमावले. खास करुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमांसाठी त्यांनी अनेक वेळा सेट उभारले आहेत.

आर्थिक विवंचनेतून आत्महत्या :

दरम्यान, उरणचे अपक्ष आमदार महेश बालदी यांनी दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी ४ वाजता कला कलादिग्दर्शक यांनी आत्महत्या केली. ते आर्थिक अडचणीत होते अशी माहिती मिळत आहे. ‘स्टुडिओ हा फ्लिमवर चालतो. मात्र, स्टुडिओ चालत नसल्यामुळे ही घटना घडली आहे. गेल्या 2 महिन्यांपूर्वी त्यांच्याशी बातचीत झाली होती. तेव्हा देखील त्यांनी आर्थिक विवंचना सुरू आहे असं सांगितलं होतं.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube