Hemangi Kavi Post: हेमांगी कवी अन् युवराज सिंग एकत्र; काय आहे नेमकं कारण…

  • Written By: Published:
Hemangi Kavi Post: हेमांगी कवी अन् युवराज सिंग एकत्र; काय आहे नेमकं कारण…

Hemangi Kavi: मराठीतील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक म्हणून हेमांगी कवीला ओळखले जाते. ती सोशल मीडियावर (Social media) तिचे मत बिनधास्तपणे मांडताना दिसते. महिलांबद्दल एखादा विषय असो किंवा खासगी आयुष्यामधील एखादा प्रसंग असो हेमांगी याबाबत अगदी खुलेपणाने बोलत असल्याचे बघायला मिळत असते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Hemangi Kavi-Dhumal (@hemangiikavi)


नुकतंच हेमांगी कवीने सोशल मीडियाच्या माध्यमातून तिचे स्वप्न साकार करत आहे तर कधी अनुभवत असल्याचे तिने यावेळी सांगितले आहे. अभिनेत्रीने नुकतीच एक पोस्ट केली आहे. यामध्ये ती स्वप्नात घडावं असं काहीसं तिच्याबरोबर घडलं असल्याचे यावेळी (Video share) तिने सांगितले आहे. ही पोस्ट तिच्या नव्या कामाबद्दल असल्याचे समजत आहे.

हेमांगी कवीची पोस्ट

हेमांगी कवीने प्रसिद्ध क्रिकेटपटू युवराज सिंगसोबतच (Yuvraj Singh) फोटोंचा व्हिडीओ शेअर केल्याचे बघायला मिळत आहे. या फोटोत हेमांगी कवी कोळीण झालूयचे बघायला मिळत आहे. हा व्हिडीओ शेअर करत असताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘किती देखणा आणि हसतमुख आहे हा माणूस!’ या व्हिडीओमधून हेमांगी कवीने युवराज सिंगचे तोंडभरून कौतुक केल्याचे दिसत आहे.

मिलन लुथरियाच्या ‘Sultan of Delhi’च्या टीझरने सोशल मीडियावर चर्चेला उधाण

हेमांगी कवी व युवराज सिंग यांनी एका आगामी जाहिरातीसाठी एकत्र मिळाले आहे. तसेच हेमांगीने शेअर केलेले हे BTS फोटोबघून जाहिरात खूपच भन्नाट राहणार असल्याचे दिसत आहे. हे नक्की असणार आहे. तिच्या या पोस्टवर अभिनेता समीर चौघुले आणि काही अन्य मंडळी देखील जोरदार कमेंट करत हेमांगीचे अभिनंदन केल्याचे दिसत आहे. तसेच अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने देखील हेमांगीच्या पोस्टवर ‘वाह वाह’ अशी कमेंट केल्याचे बघायला मिळत आहे. हेमांगी कवी स्टार प्रवाहवरील सिरीयल ‘मन धागा धागा जोडते नवा’ या सीरियलमध्ये दिसली होती. सध्या तिचे जन्मवारी हे नाटक रंगभूमीवर सुरू असल्याचे बघायला मिळत आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube