Hemangi Kavi: आई-बाबांच्या प्रायव्हसीनंतर हेमांगीची ‘ही’ पोस्ट चर्चेत, म्हणाली…

Hemangi Kavi: आई-बाबांच्या प्रायव्हसीनंतर हेमांगीची ‘ही’ पोस्ट चर्चेत, म्हणाली…

Hemangi Kavi Post: मराठीतील अभिनेत्रींपैकी एक म्हणून हेमांगी कवीला (Hemangi Kavi) ओळखले जाते. ती सोशल मीडियावर (Social media) तिचे मत बिनधास्तपणे मांडत असल्याचे दिसून येत आहे. तसेच मराठीतील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक म्हणून हेमांगी कवीला ओळखले जाते. (Hemangi Kavi Post) महिलांविषयी एखादा विषय असो किंवा खासगी आयुष्यामधील एखादा प्रसंग असो हेमांगी याबाबत अगदी खुलेपणाने बोलताना दिसून येत असते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Hemangi Kavi-Dhumal (@hemangiikavi)


हेमांगीची ‘ही’ पोस्ट चर्चेत

“Maturity is when u don’t feel like shopping for clothes anymore! थोडं weird आहे पण खरंय!
मी २०२० आणि २०२१ पुर्ण २ वर्ष कपड्यांचं बिलकुल shopping केलं नाही. Literally. एकतर on and off lockdown चालू होता, दुसरं म्हणजे त्याच काळात उमगलं की कपड्यांवर खुपच खर्च होतो आणि तिसरं म्हणजे माझ्यात फार मोठे शारीरिक बदल होत नसल्यामुळे कपड्यांचा ढीग साचतोय आणि कपाट कमी पडतंय. माझ्याकडे १५-२० वर्षांपासूनचे कपडे अजूनही चांगल्या condition मध्ये आहेत आणि मी ते वापरते.

काही माझ्या भाच्यांना देते. काही mix match करत वापरते. आता इतकी वर्ष हे कपडे टिकतात कसे तर एक म्हणजे कपडे नीट वापरायची, जपून धुवायची शिस्त आणि दुसरं म्हणजे या कला क्षेत्रात काम केल्याच्या अनेक फायद्यांमध्ये shooting set, नाटकातले कपडे दिवसभर घातल्यामुळे आमच्या personal कपड्यांचा कमीत कमी वापर.

पण आता तुम्ही कुठल्याही क्षेत्रात काम करत असलात (खासकरून महीलांसाठी) तरी Social Media मुळे एकदा का एका outfit वर तुम्ही एखादा photo post केला की झालं परत तो वापरायचा नाही असा एक अलिखित नियम रूढ होतोय. मी या नियमातून स्वतःला मुक्त केलंय. मी कपडे repeat करते. त्यावरचे photos ही post करते. बिनधास्त. काही आगाऊ लोकं comments मध्ये त्यांच्या बारीक observation ची आणि बेरकी स्वभावाची पावती देतात पण now I don’t care. आता मी ४-५ महीन्यातून एकदा shopping करते. खरंच खुप बरं वाटतं. हलकं वाटतं.

या post मधून देशा समोर उभे असलेले problems solve होणार नाहीएत किंवा या माझ्या आत्मज्ञानाने तुम्हांला काही एक फायदा होणार नाहीए हे मला माहितीए पण मला share करावंसं वाटलं म्हणून केलं. आता मला ती maturity गाठायची आहे जेव्हा हे असलं काही share करणं ही निरर्थक वाटू लागेल! You Wish me a luck and I wish u a Happy Sunday!

त.टी.: मंडळातील पुरूष सदस्यांनी लगेच आपल्या नात्यातल्या, ओळखीतल्या, घरातल्या, बाहेरच्या, online च्या, offline च्या स्रियांना ‘shopping कसं करू नये’ याचं उत्तम उदाहरण म्हणून ही post वाचून दाखवू किंवा forward करू नये अन्यथा तुमचा रविवार खराब होण्याची शक्यता उद्भवेल!”, असे हेमांगीने या पोस्टमध्ये म्हटले आहे.

तामिळनाडूत ‘द केरळ स्टोरी’ बॉयकॉट, मल्टिप्लेक्स संघटनांचा निर्णय

गेल्या काही दिवसांखाली आई-बाबांची प्रायव्हसी बद्दलच्या वक्त्यावरून ती जोरदार चर्चेत आली होती. तर आता नुकतंच हेमांगीने तिचे कपडे आणि फॅशन याबद्दल मोठे भाष्य केले आहे. हेमांगी कवी ही कायमच तिच्या वैयक्तिक गोष्टींमुळे चर्चेत असते. नुकतंच तिने सिनेसृष्टी, सोशल मीडिया आणि कपडे यांच्याबद्दल एक पोस्ट शेअर केली आहे. त्याबरोबर तिने पुरुषांना एक हटका सल्ला देखील दिला आहे.

दरम्यान हेमांगीने आतापर्यंत अनेक नाटक, मालिका, चित्रपट यासारख्या विविध क्षेत्रात काम केली आहे. यामध्ये अनेक प्रकारच्या भूमिका साकारत तिने चाहत्यांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले आहे. हेमांगी काही दिवसांपूर्वी ‘लेक माझी दुर्गा’ या सिरीयलमध्ये झळकली होती. त्याबरोबरच ‘पिपाणी’, ‘बंदीशाळा’, ‘डावपेच’ या सिनेमामधील हेमांगीच्या अभिनयाला चाहत्यांनी मोठी पसंती दिली होती. ‘तमाशा Live’ या सिनेमामध्ये देखील हेमांगीनं काम केलं होतं.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube