मिर्झापूर वेब सिरीजमधील ‘या’ अभिनेत्याचे निधन

मिर्झापूर वेब सिरीजमधील ‘या’ अभिनेत्याचे निधन

मुंबई : बॉलिवूड इंडस्ट्रीतून एक वाईट बातमी समोर आली आहे. मिर्झापूर फेम ज्येष्ठ अभिनेते शाहनवाज प्रधान (Shahnawaz Pradhan) यांचे शुक्रवारी निधन झाले. हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले, तेथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

मिर्झापूर या लोकप्रिय वेब सिरीजमधील व्यक्तिरेखेसाठी शाहनवाज प्रधान ओळखले जात होते. 56 वर्षीय शाहनवाज प्रधानने वेब सीरिजमध्ये गुड्डू भैय्या (अली फजल) च्या सासऱ्याची भूमिका केली होती. प्रधान यांच्या निधनानंतर मनोरंजन क्षेत्रात शोककळा पसरली असून चाहते त्यांना श्रद्धांजली वाहात आहेत.

Untitled Design (49)

Untitled Design (49)

अधिक माहिती अशी, शाहनवाज प्रधान एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी गेले होते, तेथे त्यांना छातीत दुखत असल्याचे जाणवल्याने त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. प्रधान यांचा रुग्णालयात मृत्यू झाला. मिर्झापूर या वेबसिरीजमधील शाहनवाज प्रधान यांचा सहकलाकार राजेश तैलंग याने आपल्या ट्विटर हँडलवर ही दुःखद बातमी शेअर केली आहे.

कोण होते शाहनवाज प्रधान?
शाहनवाज प्रधान यांचा जन्म ओडिशातील एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला होता. वयाच्या सातव्या वर्षी, तो आपल्या कुटुंबासह रायपूरला गेला आणि 7वी इयत्तेत त्यांनी पहिल्यांदा रंगमंचावर सादरीकरण केले. शाहनवाज 80 च्या दशकात लोकप्रियही झाले होते. त्यावेळी त्यांनी दूरदर्शनच्या श्री कृष्ण या शोमध्ये नंदची भूमिका साकारली होती. यानंतर ते अलिफ लैलामध्येही दिसले.

पोटात गॅस झाला तर या गोष्टींचे सेवन टाळा

सिनेकारकिर्द
शाहनवाज प्रधान यांनी बॉलिवूड चित्रपटांव्यतिरिक्त टीव्ही आणि ओटीटी प्लॅटफॉर्मवरही बरेच काम केले होते. प्रधान यांनी ‘एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी’, ‘खुदा हाफिज’, ‘रईस’ आणि ‘फँटम’ या वेबसिरीजशिवाय ‘द फॅमिली मॅन’ आणि ‘होस्टेज’ या चित्रपटांमध्येही काम केले आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube