Download App

Nitin Desai Suicide : देसाईंच्या आत्महत्येमागं फक्त कर्ज नाही, सिनेसृष्टीतील नामवंतांवर मनसे नेत्याचा धक्कादायक आरोप

Nitin Desai Suicide : सुप्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांनी (Nitin Chandrakant Desai) गळफास घेऊन आपलं जीवन संपवलं आहे. कर्जतमधील एन. डी. स्टुडीओमध्ये नितीन चंद्रकांत देसाईंनी आत्महत्या केली. त्यानंतर त्यांच्यावर कर्ज असल्याने त्यांनी आत्महत्या केली असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यात आता आणखी एक अपडेट ससोर आली आहे. मनसे या पक्षाच्या रायगड अध्यक्षांनी एक धक्कादायक दावा केला आहे. ( MNS Raigad Chief expose shocking reason behind Nitin Desai Suicide )

सरकार किती खोटं बोलणार? आव्हाडांकडून भिडेंच्या सुरक्षेचा पुरावाचा सादर

एकीकडे देसाई यांच्यावर कर्जाचा डोंगर होता. नितीन देसाई यांच्यावर 250 कोटी रुपयांचे कर्ज होते. त्यांनी एका कंपनीकडून 180 कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. व्याजासह कर्जाची एकूण रक्कम 250 कोटी झाली होती. त्यामुळे त्यांच्यावर आर्थिक ताण आला होता. याच ताणतून त्यांनी जीवनयात्रा संपवल्याचे बोलले जात आहे. मात्र मनसेचे रायगड अध्यक्ष जितेंद्र पाटील यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना या प्रकरणी कला क्षेत्रातील नामवंत मंडळींवर गंभीर आणि धक्कादायक आरोप केले आहेत.

नितीन देसाईंची आत्महत्या : फायनान्स कंपन्यांची पठाणी वसुली ऐरणीवर; बड्या बँकरचा महत्वाचा सल्ला

काय म्हणाले जितेंद्र पाटील?

माध्यमांशी बोलताना जितेंद्र पाटील म्हणाले की, देसाई गेल्या काही दिवसांपासून अस्वस्थ होते. अनेक बाबींवर ते चर्चा करत होते. अर्थिक अडचणी होत्याच. पण कला क्षेत्रातील नामवंत मंडळींकडून त्यांच्या एन. डी स्टुडिओला शूटींग येऊ दिल्या जात नव्हत्या. आज त्यांनी जीवन संपवलं. लोक त्यांना श्रद्धांजली वाहत आहेत. पण या घटनेमागील मूळ गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे आहे. याला कारणीभूत कोण आहे? हे शोधणे गरजेचे आहे. कारण एवढा मोठा स्टुडिओ चालवताना शूटींग मिळणे गरजेचे होते. मात्र त्यांच्यावर कोण दबाव टाकत होत? शूटींग कोण मिळू देत नव्हतं? हे शोधणे गरजेचे आहे. तसेच ते या विषयावर आपल्याशी बोलत होते. असं देखील यावेळी पाटील म्हणाले.

त्यामुळे एकीकडे या प्रकरणाला नवं वळण आलं आहे. नितीन देसाई यांनी काल रात्री दिल्लीहून आल्यानंतर काही ऑडिओ क्लिप (Audio clip) रेकॉर्ड केल्या होत्या. त्यात सुमारे चार बिझनेसमनचा उल्लेख असल्याचं सांगितलं जात आहे. तर दुसरीकडे मनसे या पक्षाच्या रायगड अध्यक्षांनी या कला क्षेत्रातील नामवंत मंडळींवर केलेल्या गंभीर आरोपामुळे या घटनेचे वेगवेगळे कारणं समोर येत आहेत.

Tags

follow us