कामावर परतली मायोसिटिसग्रस्त सामंथा, ‘शकुंतलम’ ची डबिंग सुरू

कामावर परतली मायोसिटिसग्रस्त सामंथा, ‘शकुंतलम’ ची डबिंग सुरू

चेन्नई : मायोसिटिस नावाच्या ऑटो-इम्यून आजाराने ग्रस्त असलेली अभिनेत्री सामंथा रुथ प्रभुच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत आहे. सामंथा आता पुन्हा कामवर परतली आहे. समांथाने गुरुवारी सोशल मिडीयवर यासंदर्भात पोस्ट करत माहिती दिली आहे.

सामंथाने आगामी चित्रपट ‘शाकुंतलम’ साठी डबिंग सेशनचा एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करताना तीने कॅप्शनमध्ये लिहिले की, ऑस्ट्रेलियन लेखिका निक्की रोवेचा एक वाक्य शेअर केले आहे. ‘जगात हे वेड, उदासीनता आणि एकटेपणासाठी माझी कला माझा इलाज आहे आणि त्यातून मी स्वतः जाईल. -निक्की रोवे #शकुंतलम’ असं कॅप्शन तीने दिलं आहे.

त्याचबरोबर सामंथा रुथ प्रभुने इंस्टाग्रामवर पोस्ट केली आहे. त्यावर, चिन्मयी श्रीपदाने कमेंट सेक्शनमध्ये लिहिले की, ‘याआस क्वीन !!!’. तर समांथाच्या अनेक चाहत्यांना कमेंटमध्ये ती मायोसिटिसमधून लवकर बरी व्हावी यासाठी प्रार्थना केली आहे. तर अभिनेता सत्यराजची मुलगी दिव्या सत्यराज, जी एक डाइटिशियन आहे तीने लिहिले की, ‘रॉकस्टार, आम्ही तुझ्या सोबत आहोत.’

2023 च्या सुरुवातीला, सामंथाने नव वर्षासाठी संकल्प एअर करत सकारात्मकता दाखवली होती. तर नुकतच समांथा रुथ प्रभुने प्रकृतीमुळे अॅमेझॉन प्राईम व्हिडिओची वेब सीरीज सिटाडेलमधून बाहेर पडणार आहे. अशा चर्चा होत्या. तर तिच्या जवळच्या व्यक्तींनी या अफवा फेटाळून लावल्या आहेत. तिच्या टीमने सांगितले की, ‘ती जानेवारीच्या मध्यात शूटिंग सुरू करेल.” शकुंतलम नंतर, सामंथा रुथ प्रभू कुशीमध्ये विजय देवरकोंडासोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube