‘सरके चुनरी तेरी’ वादावर संजय दत्तने माफी मागितली; 50 आदिवासी मुलींच्या शिक्षणाचा खर्च उचलणार !

Sanjay Dutt-अभिनेता संजय दत्त सोमवारी आयोगासमोर हजर झाला. त्याने या गाण्याबाबत महिला आयोगासमोर माफी मागितली.

  • Written By: Published:
Sarke Chunnar Sarke

नवी दिल्ली-बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेही (Nora Fatehi) आणि अभिनेता संजय दत्त (Sanjay Dutt) यांच्या ‘सरके चुनरी तेरी’ (
Sarke Chunar Teri Sarke) गाण्यावरून जोरदार वाद रंगला होता. राष्ट्रीय महिला आयोगाने स्वत:हून दखल घेत गाण्यातील कलाकार, निर्माते यांना राष्ट्रीय महिला आयोगाने (NCW) फटकारले होते. तसेच सर्वांना सुनावणीसाठी बोलविले होते. अभिनेता संजय दत्त सोमवारी आयोगासमोर हजर झाला. त्याने या गाण्याबाबत महिला आयोगासमोर माफी मागितली. तसेच 50 आदिवासी मुलींच्या शिक्षणाचा खर्च उचलण्याचे प्रतिज्ञापत्र महिला आयोगाला दिले आहे.

संजय दत्त यांचे वकील हेमंत शाह यांच्या म्हणण्यानुसार गाण्याचे चित्रीकरण होत असताना ते कन्नड भाषेत होते. नंतर त्यांच्या नकळत ते हिंदीमध्ये डब करण्यात आले आहे. गाण्यातील कथित आक्षेपार्ह आणि अश्लीलतेच्या आयोगाने स्वतःहून दखल घेतली होती. 6 एप्रिल रोजी झालेल्या सुनावणीत नोरा फतेही यांचे वकील त्यांच्या वतीने हजर झाले. परंतु आयोगाने ते मान्य केले नाही. अभिनेत्री नोरा फतेही हिने स्वतः सुनावणीला हजर रहावे, असा आदेश महिला आयोगाने दिला आहे.

आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी सुनावणीदरम्यान गाण्याच्या गीतांवर तीव्र आक्षेप व्यक्त केला. अशी गाणी महिलांच्या प्रतिष्ठेच्या विरोधात आहेत. सृजनशीलतेच्या नावाखाली महिलांच्या प्रतिष्ठेशी तडजोड केली जाऊ शकत नाही, अशा शब्दात महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांना फटकारले आहे.


सरके चुनर तेरी या गाण्याभोवती नेमका कोणता वाद ?

या प्रकरणात गीतकार रकीब आलम, दिग्दर्शक प्रेम आणि गीत निर्मिती कंपनीचे प्रतिनिधी आयोगासमोर हजर झाले. त्यांनी लेखी माफीनामा जारी करून, गाण्याचा समाजावर झालेला नकारात्मक परिणाम मान्य केला आणि भविष्यात महिला सक्षमीकरणासाठी काम करण्याचे वचन दिले. केडी: द डेव्हिल’ या कन्नड चित्रपटातील या वादग्रस्त गाण्याला प्रदर्शित झाल्यावर सोशल मीडियावर तीव्र टीकेला सामोरे जावे लागले. वाढत्या विरोधानंतर, हे गाणे यूट्यूबवरून काढून टाकण्यात आले.

follow us