Oppenheimer Movie Tickets : हॉलिवूडचे दिग्दर्शक क्रिस्ट्रोफर नोलन यांचा ‘ओपेनहायमर’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मात्र रिलीजच्या आधीच हा चित्रपट त्याच्या तिकिटची किंमतीमुळे प्रचंड चर्चेत आला आहे. कारण या चित्रपटाच्या एका तिकिटची किंमत तब्बल अडिच हजारच्या आसपास आहे. त्यामुळे या चित्रपटाने टॉम क्रुजच्या ‘मिशन इम्पॉसिबल 7’ तिकिटाच्या किंमतीबाबत मागे टाकले आहे. ( Oppenheimer Movie Tickets will shocked you but Audience response too exuberant )
अहमदनगरमध्ये पोलिसांच्या वर्दीला काळीमा, PSI कडून महिलेवर अत्याचार, गुन्हा दाखल होताच आरोपी फरार
कोणत्या शहरात कीती पैसे मोजावे लागणार?
दिल्लीत या चित्रपटासाठी प्रेक्षकांना 2 हजार रूपये मोजावे लागणार आहेत. तर मुंबईत पीवीआर सिलेक्ट सिटी वॉकमध्ये 2 हजार 100 रूपये आणि पीवीआर पॅलेडियम मॉलमध्ये 2 हजार चारशे पन्नास रूपये मोजावे लागणार आहेत. तरी देखील लोक मागे हटलेले नाही. बुधवारपर्यंतची या चित्रपटाची 85 टक्के तिकिटं बुक झाली आहेत.
Asia Cup 2023: ‘या’ दिवशी होणार भारत-पाकिस्तान महामुकाबला, आशिया कपचे वेळापत्रक जाहीर?
हॉलिवूडचे दिग्दर्शक क्रिस्ट्रोफर नोलन यांच्या ‘ओपेनहायमर’ चित्रपटाविषयी भारतीय प्रक्षकांमध्ये प्रचंड क्रेज आहे. तसेच चित्रपट आयमॅक्सवर पाहण्यात चाहत्यांना प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. त्यामुळे या चित्रपटासाठी लोक कितीही पैसे मोजायला तयार आहेत. तसेच या चित्रपटाचं तिकिट इतक महाग असण्याचं कारण म्हणजे वर्ल्डवाइड आयमॅक्सवर एका वेळी एकच चित्रपट लागू शकतो. त्यामुळे त्याचे एका दिवसांत केवळ 125 शो होऊ शकतील.
दरम्यान या तिकिटाची किंमत आणि चित्रपटाची क्रझ पाहता या चित्रपटाच्या कमाईचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाची टक्कर बार्बी या चित्रपटाशी होणार आहे. त्यामुळे हाच चित्रपट बाजी मारणार हे स्पष्ट आहे. तर पहिल्या दिवशी हा चित्रपट 7 ते 8 कोटींची कमाई करू शकतो. हा चित्रपट इंग्लिशसह हिंदीतही रिलीज होणार आहे.