Asia Cup 2023: ‘या’ दिवशी होणार भारत-पाकिस्तान महामुकाबला, आशिया कपचे वेळापत्रक जाहीर

  • Written By: Published:
Asia Cup 2023: ‘या’ दिवशी होणार भारत-पाकिस्तान महामुकाबला, आशिया कपचे वेळापत्रक जाहीर

India Vs Pakistan : आशिया चषक 2023 ची सुरुवात होण्यासाठी काही दिवस बाकी आहेत, परंतु या स्पर्धेचे वेळापत्रक अद्याप जाहीर झालेले नाही. या स्पर्धेतील भारत-पाकिस्तान सामन्याची प्रत्येकजण आतुरतेने वाट पाहत आहे. दरम्यान, आशिया चषक स्पर्धेचे ड्राफ्ट वेळापत्रक समोर आले आहे. त्यानुसार भारत आणि पाकिस्तानचे संघ 2 सप्टेंबरला कॅंडीमध्ये होणार आहे. हा सामना श्रीलंकेत होणार आहे. (Asia Cup 2023: ind vs pak india will play match against pakistan on 2 september)

ही स्पर्धा 29 ऑगस्टपासून सुरू होणार आहे

आशियाई क्रिकेट कौन्सिल (ACC) ने 2023 आशिया चषक स्पर्धेची सुरुवात 30 ऑगस्टपासून होणार आहे , पाकिस्तान 2 सप्टेंबर रोजी कँडी, श्रीलंका येथे भारताशी खेळणार आहे. मुलतानमध्ये यजमान पाकिस्तान आणि नेपाळ यांच्यातील सामन्याने स्पर्धेची सुरुवात होईल आणि अंतिम सामना 17 सप्टेंबर रोजी खेळवला जाईल.

पाकिस्तानच्या दोन शहरात सामने होणार आहेत

PCB मूळ योजना पाकिस्तानने त्यांचे चारही सामने एकाच शहरात खेळवण्याची होती. परंतु नवीन अध्यक्ष झका अश्रफ यांच्या नेतृत्वाखालील PCB व्यवस्थापनाने या महिन्याच्या सुरुवातीला जेव्हा पदभार स्वीकारला तेव्हा मुलतानला दुसरे ठिकाण म्हणून समाविष्ट करण्यात आले. मसुद्याच्या वेळापत्रकानुसार, लाहोरमध्ये तीन सामने होणार आहे. आणि मुलतानमध्ये फक्त पहिला सामना होईल.

ICC Test Rankings: कसोटी क्रमवारीत अश्विन-जडेजाचा दबदबा, यशस्वी जैस्वालची मोठी झेप

स्पर्धेत 13 सामने होणार आहेत

या स्पर्धेत एकूण 13 सामने खेळवले जाणार आहेत. हे सर्व सामने पाकिस्तानच्या वेळेनुसार दुपारी एक वाजता सुरू होतील. पाकिस्तानसह भारत आणि नेपाळ अ गटात आहेत. श्रीलंका, बांगलादेश आणि अफगाणिस्तान ब गटात आहेत. प्रत्येक गटातील अव्वल दोन संघ सुपर फोरसाठी पात्र ठरतील आणि या टप्प्यातील अव्वल दोन संघ अंतिम फेरीत प्रवेश करतील. यावेळी आशिया कप 50 षटकांच्या फॉरमॅटमध्ये खेळवला जाईल.

आशिया कप 2023 पूर्ण वेळापत्रक

30 ऑगस्ट – पाकिस्तान विरुद्ध नेपाळ – मुलतान
31 ऑगस्ट – बांगलादेश विरुद्ध श्रीलंका – कॅंडी
2 सप्टेंबर – भारत विरुद्ध पाकिस्तान – कॅंडी
3 सप्टेंबर – बांगलादेश विरुद्ध अफगाणिस्तान – लाहोर
4 सप्टेंबर – भारत विरुद्ध नेपाळ – कॅंडी
5 सप्टेंबर – श्रीलंका विरुद्ध अफगाणिस्तान – लाहोर

सुपर-4 (सर्व संघ तीन सामने खेळतील)

6 सप्टेंबर – A1 विरुद्ध B2 – लाहोर
6 सप्टेंबर – B1 वि B2 – कॅंडी
10 सप्टेंबर – A1 वि A2 – कॅंडी
12 सप्टेंबर – A2 वि B1 – डंबुला
14 सप्टेंबर – A1 विरुद्ध B1 – डंबुला
15 सप्टेंबर – A2 विरुद्ध B2 – डंबुला

अंतिम

17 सप्टेंबर – अंतिम – कोलंबो

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube