‘पीएसआय अर्जुन’ मधील अंकुशचा डॅशिंग लूक चर्चेत…, अभिनेता रितेश देशमुखने दिल्या शुभेच्छा!

‘पीएसआय अर्जुन’ मधील अंकुशचा डॅशिंग लूक चर्चेत…, अभिनेता रितेश देशमुखने दिल्या शुभेच्छा!

P.S.I Arjun : मराठी इंडस्ट्रीमध्ये सुपरस्टार म्हणून ओळखला जाणारा अंकुश चौधरी (Ankush Chaudhary) पुन्हा एकदा चर्चेत आला असून नुकतेच ‘पी.एस.आय अर्जुन’ (P.S.I Arjun) या त्याच्या आगामी चित्रपटाचे धमाकेदार पोस्टर सोशल मीडियावर झळकले आहे. दोन वर्षांनंतर पडद्यावर झळकताना अंकुश एका वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे.

अंकुश पहिल्यांदाच पोलिसाच्या भूमिकेत दिसणार असल्याने त्याच्या या रुबाबदार लूकने सर्वांचेच लक्ष वेधले आहे. स्टाईल आयकॉन अंकुशच्या या जबरदस्त लुकमुळे इंटरनेटवर खळबळ उडाली असून ‘पी.एस.आय. अर्जुन’चे पोस्टर पाहूनच त्याच्या चाहत्यांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. विशेष म्हणजे, मराठमोळा अभिनेता रितेश देशमुखनेही अंकुशला शुभेच्छा दिल्या आहेत.

अंकुशच्या इंस्टाग्राम पोस्टवर कमेंट करत रितेश देशमुखने (Riteish Deshmukh) त्याच्या नव्या चित्रपटाला पाठिंबा दिला आहे. रितेश देशमुखचा या खास पाठींब्याने सर्वांचे लक्ष वेधले असून त्याच्या या नव्या प्रवासाला चाहते आणि इंडस्ट्रीमधील मित्रमंडळींनी दिलेला भरभरून प्रतिसाद बघता, ‘पी.एस.आय अर्जुन’ चित्रपटावर आधीच हिट होण्याची मोहोर उमटली आहे.

WhatsApp Image 2025 04 07 At 11.53.47 AM

व्हिस्ट्रोमॅक्स सिनेमा, ड्रिमविव्हर एंटरटेनमेंट निर्मित  ‘पी.एस.आय.अर्जुन’ हा चित्रपट येत्या 9 मे 2025 रोजी प्रदर्शित होणार असून या चित्रपटाचे दिग्दर्शक भूषण पटेल आहेत तर विक्रम शंकर आणि ध्रुव दास निर्माते आहेत.

अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणात सरकारला दणका, पोलिसांवर गुन्हा दाखल होणार 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube