राज ठाकरेंचा डंका; पाकिस्तानी सिनेमाचे प्रदर्शन रद्द

  • Written By: Published:
राज ठाकरेंचा डंका; पाकिस्तानी सिनेमाचे प्रदर्शन रद्द

मुंबईः पाकिस्तानचा बहुचर्चित चित्रपट द लीजेंड ऑफ मौला जट्ट हा जगभरात प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरत आहे. हा चित्रपट भारतात आज प्रदर्शित होणार होता. या चित्रपटाला विरोध झाल्यानंतर हा चित्रपट भारतात प्रदर्शित होणार नाही. याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी ट्वीट करत ही माहिती दिली आहे.

मनसेच्या आंदोलनामुळे या चित्रपटाचे प्रदर्शन भारतात रद्द झाले असल्याचे ट्वीट खोपकर यांनी केले. राजसाहेबांचा डंका, पाकिस्तानला दणका, असे आशयाचे ट्वीट खोपकर यांनी केले. पुन्हा जर कुणाला पाकिस्तानी कलाकारांबद्दल प्रेमाचा उमाळा वगैरे आला तर त्यांच्यासाठी एवढा एक इशारा पुरेसा आहे. मनसे आंदोलनाच्या या विजयाबद्दल माझ्या सर्व सहकाऱ्यांचं मनापासून अभिनंदन. मनसेने दिलेल्या इशाऱ्यानंतर ‘द लीजंड ऑफ मौला जट्ट’ या पाकिस्तानी चित्रपटाचे प्रदर्शन आता पूर्णपणे रद्द करण्यात आले आहे. केवळ राज्यातच नाही संपूर्ण देशभरात कुठेही हा चित्रपट आता प्रदर्शित होणार नाही, असे खोपकर यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

हा चित्रपट ‘मौला जट्ट’ या चित्रपटाचा रिमेक आहे. यात फवाद खान आणि माहिरा खान यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट भारतात २३ डिसेंबरला प्रदर्शित होणार होता. ही तारीख रद्द करून ती ३० डिसेंबर करण्यात आली होती. सेंसर बोर्डने चित्रपट प्रदर्शनास परवानगी दिली होती. या चित्रपटाला विरोध झाल्यानंतर परवानगी रद्द करण्यात आली आहे. या चित्रपटाने जगभरात दोनशे कोटी रुपयांचा गल्ला जमविल्याचे बोलले जात आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube