Parineeti Chopra Raghav Chadha: क्रिकेट मॅचनंतर आता डिनर ; राघव अन् परिणीतीच्या नात्याबाबत जोरदार चर्चा

  • Written By: Published:
Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 04 03T101536.878

Parineeti Chopra Raghav Chadha : आम आदमी पक्षाचे नेते राघव चढ्ढा (Raghav Chadha) आणि बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री परिणीती चोप्रा (Parineeti Chopra) यांच्या नात्याविषयी गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी पंजाब किंग्ज (Punjab Kings) आणि मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) यांच्यात आयपीएल 2023 (IPL 2023) चा सामना बघण्यासाठी राघव चढ्ढा आणि परिणीती हे एकत्र दिसून आले होते.

आता राघव आणि परिणीती हे डिनर डेटला गेले होते, अशी चर्चा सोशल मीडियावर जोरदार सुरु आहे. राघव चढ्ढा आणि परिणीती हे एका रेस्टॉरंटमध्ये पुन्हा स्पॉट झाले आहेत. राघव चढ्ढा आणि परिणीती यांचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत. यावेळी परिणीती ही ऑल ब्लॅक आऊट फिट आणि व्हाईट शू अशा लूकमध्ये दिसून आली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)


राघव चढ्ढा आणि परिणीती यांच्या व्हायरल व्हिडीओमध्ये दिसत आहे की, ‘एक फोटोग्राफर परिणीतीला विचारत आहे की, तुम्ही लग्न कधी करणार आहेत? ‘राघव चढ्ढा आणि परिणीती यांनी त्यांच्या नात्याविषयी अजून देखील कोणती देखील माहिती चाहत्यांना मिळालेली नाही. दोघांच्या डेटिंगच्या चर्चेविषयी गेल्या काही दिवसांपूर्वी राघव चढ्ढा यांना विचारण्यात आले होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Lifestyle Asia India (@lifestyleasiaindia)


त्यावेळी आपचे नेते राघव चढ्ढा यांनी मीडियाला सांगितले होते की, ‘मला राजकारणाबाबत विचारा, परिणीतीविषयी नाही.’ परिणीतीला एका मुलाखतीत तिच्या वैयक्तिक आयुष्याविषयी सोशल मीडियावर होणाऱ्या चर्चेविषयी विचारण्यात आले होते.

तामिळनाडूत ‘द केरळ स्टोरी’ बॉयकॉट, मल्टिप्लेक्स संघटनांचा निर्णय

यावेळी ती म्हणाली, ‘मीडियाच्या माध्यमातून माझ्या वैयक्तिक जीवनाविषयी चर्चा केली जात आहे. कधी-कधी तर मार्यादा ओलांडून लोक पर्सनल गोष्टींविषयी चर्चा करत असतात. याला तुम्ही अपमान समजू शकता! चर्चा करणं आणि अपमान करणे, यामध्ये एक लहान रेष आहे. एखाद्या गोष्टीचे स्पष्टीकरण मला द्यावं लागत असेल तर मी देणार नाही, असे यावेळी ती म्हणाली होती.

Tags

follow us