Project K: Nag Ashwin च्या आगामी सिनेमातील Prabhas चा लूक कसा दिसणार? पाहा पहिलं पोस्टर…

Project K: Nag Ashwin च्या आगामी सिनेमातील Prabhas चा लूक कसा दिसणार? पाहा पहिलं पोस्टर…

Prabhas Look In Project K: साऊथमधील काही कलाकार सध्या बॉलिवूडकडे (Bollywood) वळत असताना दिसून येत आहेत. यामध्ये साऊथ स्टार प्रभासचे नाव सर्वप्रथम आहे. प्रभास (Prabhas) लवकरच अभिनेत्री दीपिका पदुकोण, बिग बी आणि कमल हसन यांच्याबरोबर ‘प्रोजेक्ट के’ (Project K) नावाच्या हटके सिनेमात दिसून येणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Prabhas (@actorprabhas)


या फिल्म प्रोजेक्टविषयी (Film project) सध्या अनेक वेगवेगळ्या चर्चा रानगात असल्याचे दिसून येत आहे. अशातच आता निर्मात्यांनी प्रभासचा पहिला लूक प्रदर्शित केला आहे. या लूकमध्ये प्रभास एका योद्ध्याच्या भूमिकेमध्ये दिसून आला आहे. या सिनेमाची सध्या जोरदार तयारी असल्याचे दिसून येत आहे. प्रभास स्टारर सिनेमाच्या या पहिल्या लूकची पोस्ट सोशल मीडियावर (Social media) जोरदार धुमाकूळ घालत आहे.

‘प्रोजेक्ट के’ची संपूर्ण टीम सध्या सॅन दिएगो कॉमिक कॉन २०२३ महोत्सवामध्ये सहभागी होण्यासाठी अमेरिकेत गेल्याचे सांगण्यात येत आहे. आज (२० जुलै) या सिनेमाबद्दल आणखी काही महत्त्वाची माहिती जाहीर करण्यात येणार आहे. सिनेमाच्या टीमने बुधवारी अमेरिकेत अनेक फोटो देखील शेअर केले आहेत. या फोटोत प्रभास आणि राणा डग्गुबती ‘प्रोजेक्ट के’चे हुडी घातल्याचे दिसून आले आहेत. परंतु त्यासमोर हॉलिवूड लिहिले असल्याचे दिसून येत आहे. याबरोबरच ‘प्रोजेक्ट के’ सिनेमात खास भूमिका साकारणारे कमल हसन देखील अमेरिकेमध्ये पोहोचले आहेत.

कमल हासनने देखील अमेरिकेत रस्त्यांवर उभारून फोटो शेअर केले आहे. या फोटोत कमल हासन टोपी घालून रस्त्यावर फिरत असल्याचे दिसून येत आहेत. ‘प्रोजेक्ट के’ हा सिनेमा सॅन दिएगो कॉमिक-कॉन २०२३ मध्ये सहभागी होणारा पहिला देशातला सिनेमा ठरणार आहे. या महोत्सवामध्ये ‘प्रोजेक्ट के’ सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात येणार आहे. याबरोबरच सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख देखील जाहीर करण्यात आली आहे. सिनेमाचे याबद्दल दिग्दर्शक नागश्विन म्हणाले आहेत की, ‘भारत हा कायम अनेक सुपरहिरोंचा वास असलेला देश आहे.

Manipur महिलांवरील अत्याचाराचा व्हिडीओ पाहून कलाकारांनी व्यक्त केला संताप, ट्वीट करत म्हणाले…

आता जगभरात चाहत्यांना आम्ही आमच्या सिनेमाशी जोडण्याचा प्रयत्न करणार आहोत. अभिनेत्री दीपिका पदुकोण, अभिनेते बिग बी आणि प्रभास यांचा ‘प्रोजेक्ट के’ हा सिनेमा २ भागात प्रदर्शित होणार असल्याचे सांगितले जात आहे. या सिनेमाच्या पहिल्या भागामध्ये कथेत सस्पेन्स बघायला मिळाला आहे. तर दुसऱ्या भागामध्ये त्या पाठीमागची कथा असल्याचे सांगितले जात आहे. ‘प्रोजेक्ट के’ हा एक सायन्स फिक्शन सिनेमा आहे, तर त्याचे दिग्दर्शन नाग अश्विन करत आहेत. सध्या या सिनेमाचा पहिला भाग पूर्णपणे तयार झाल्याचे सांगितले जात आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube