“प्राजक्तराज” आता “प्राजक्तसाज”; मोठी घोषणा करत प्राजक्ता माळीने बदलली ज्वेलरी ब्रॅण्डची ओळख

Prajakta Mali : सोशल मीडियावर नेहमी चर्चेत राहणारी मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळीने तिच्या ज्वेलरी ब्रॅण्डबाबत मोठा निर्णय घेत नाव बदलाची

Prajakta Mali

Prajakta Mali : सोशल मीडियावर नेहमी चर्चेत राहणारी मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळीने तिच्या ज्वेलरी ब्रॅण्डबाबत मोठा निर्णय घेत नाव बदलाची घोषणा केली आहे. तिने इंस्टाग्रामवर लाईव्ह येत याबाबत माहिती दिली आहे. प्राजक्ता माळीने 2023  मध्ये ‘प्राजक्ताराज’ या नावाने ज्वेलरी ब्रॅण्ड सुरु केला होता मात्र आता या ब्रॅण्डचं नाव तिने चेंज केले आहे. ‘प्राजक्ताराज’ आता ‘प्राजक्तासाज’ म्हणून ओळखला जाणार आहे.

यावेळी प्राजक्ता माळी (Prajakta Mali) म्हणाली की, आजच्या लाईव्हमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आजचं लाईव्ह अतिशय स्पेशल आहे. आजचं लाईव्ह माझ्या आणि आपल्या ब्रॅण्डसंदर्भात आहे. नव्या आर्थिक वर्षात माझ्या ज्वेलरी ब्रॅण्डचं नाव प्राजक्तासाज – Reviving Maharashtra’s Legacy असं असणार आहे.

मी तीन- सव्वातीन वर्षांपूर्वी हा ब्रॅण्ड सुरु केला होता. तेव्हा मला बिझनेसविषयी काहीच कल्पना नव्हती. फक्त यामागे एकच विचार होता की, आपले मराठमोळे, पारंपारिक दागिने पुन्हा एकदा प्रकाशझोतात आणायचे. अर्थात तीन वर्षांपूर्वी मला बिझनेसमध्ये इतकं काहीच कळत नव्हतं पण, आता हा बिझनेस इतका मोठा होईल याची मला खरंच कल्पना नव्हती. आता जेवढा खप आपला महाराष्ट्रात आहे. तेवढाच खप भारतात आणि संपूर्ण जगात आहे. ग्राहकांच्या अतिशय उत्तम प्रतिक्रिया येत आहे. पण, अनेकदा शिपिंगदरम्यान खूप अडथळे आले.. म्हणून ठरवलं यातून आता मार्ग काढायचा आणि यातूनच प्राजक्तासाज – Reviving Maharashtra’s Legacy हे नाव जन्माला आलेलं आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Prajaktta Mali (@prajakta_official)

मेट्रो वूमन BMC च्या पहिल्या महिला आयुक्त अश्विनी भिडे कोण ?-

आम्हाला लोगे सुद्धा बदलायचा होता पण, आता जो आहे त्याच्यापेक्षा सुंदर लोगो आम्हाला सापडला नाही. त्यामुळे लोगो सेम राहील. मला टॅगलाइनमध्ये महाराष्ट्र शब्द हवा होता. या पाठीमागे अजूनही बरीच कारणं आहेत. जी मी तुम्हाला कधीच सांगू शकणार नाही आणि तुम्हाला ती कधीच कळणार नाहीत असं या लाईव्ह दरम्यान प्राजक्ता माळी म्हणाली.

follow us