Rajinikanth: थलायवा ठरला भारतातील सर्वात महागडा अभिनेता; जेलरसाठी घेतले तब्बल ‘एवढे’ मानधन

Rajinikanth: थलायवा ठरला भारतातील सर्वात महागडा अभिनेता; जेलरसाठी घेतले तब्बल ‘एवढे’ मानधन

Rajinikanth: साऊथ सुपरस्टार थलायवा म्हणजेच चाहत्यांचा लाडका रजनीकांत (Rajinikanth) यांचा सिनेमा बॉक्स ऑफिसवर (box office) सध्या जोरदार धुमाकूळ घालत आहे. १० ऑगस्ट दिवशी थलायवाचा ‘जेलर’ (Jailer) सिनेमा प्रदर्शित करण्यात आला. थलायवा यांच्या चाहत्यांनी लाडक्या अभिनेत्याचा सिनेमा तब्बल ६०० कोटीच्या वर कमाई केला आहे. जेलरने देशभरात ६00 कोटींचा मोठा गल्ला कमावला आहे.

सिनेमात काम करण्यासाठी थलायवा यांनी नेमकं किती मानधन घेतलं याचा आकडा ऐकून चाहते देखील हैराण होणार आहेत. थलायवा हे देशातील सर्वाधिक मानधन घेणारे अभिनेतेही बनले असल्याच्या बातम्या सध्या सोशल मीडियावर (Social media) बघायला मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार थलायवा यांना जेवढे मानधन मिळालं तेवढं कदाचित एखाद्या बॉलिवूड अभिनेत्याला देखील मिळालं नसणार आहे. ही माहिती फिल्म इंडस्ट्री ट्रॅकर मनोबाला विजयन यांनी यावेळी दिल्याची माहिती समोर आली आहे.

तसेच ही माहिती शेअर करत असताना त्यांनी एक फोटो देखील पोस्ट केला आहे. थलायवा यांच्या जेलरच्या मानधनाबद्दल मनोबाला विजयन यांनी सांगितले आहे की, ‘कलानिधी मारन यांनी सुपरस्टार रजनीकांत यांना दिलेल्या १०० कोटी रुपयांचा धनादेश असल्याची माहिती मिळाली आहे. तसेच त्याने पुढे लिहिले आहे की, जेलरच्या नफ्यातील शेअरिंगचा चेक होता. थलायवा यांना या सिनेमात काम करण्यासाठी ११० कोटींचं मानधन दिल्याचे बघायला मिळत आहे. एकूण २१० कोटी रुपये देण्यात आले आहेत.

Subhedar ची लक्षवेधी कामगिरी! पहिल्या आठवड्यात जमवला ‘इतक्या’ कोटींचा गल्ला, कमाईचा आकडा समोर

तसेच थलायवा हे देशातील सर्वात महागडे कलाकार ठरले असल्याचे दिसत आहे. परंतु याला अधिकृत दुजोरा आजून देखील मिळालेला नाही. जेलरच्या कलेक्शनविषयी सांगायचं झाले तर, हा तिसरा सर्वाधिक कमाई करणारा दक्षिण भारतीय चित्रपट ठरला आहे. KGF 2 आणि बाहुबली 2 या यादीमध्ये सर्वात पहिला येऊन बसला आहे. १० ऑगस्ट दिवशी प्रदर्शित झालेल्या या सिनेमाने आतापर्यंत अनेक रेकॉर्ड मोडल्याचे बघायला मिळत आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube