Rajnikanth Birthday : संघर्षाच्या कथा अनेकदा ऐकल्या, यावेळी जाणून घेऊ थलायवाची लव्ह स्टोरी…
Rajnikanth Birthday : जसं सचिन तेंडुलकरला क्रिकेटचा देव मानलं जात. तसं दाक्षिणात्य सिनेसृष्टीत अभिनेते रजनीकांत (Rajnikanth Birthday) यांना देखील देव मानला जातं. त्यांचं चित्रपटसृष्टीमध्ये येण्यापर्यंतचं स्ट्रगल, अभिनय, ॲक्शन या सर्व गोष्टींनी त्यांनी प्रेक्षकांच्या मनात आढळ स्थान निर्माण केलं आहे. त्यामुळे प्रेक्षकांचे थलायवा झाले आहेत. आज याच थलायवाचा जन्मदिवस आहे. रजनीकांत यांच्या जन्मदिवसाच्या निमित्त त्यांच्या स्ट्रगलच्या अनेक कथा आपण आजपर्यंत ऐकल्या आहेत. मात्र यावेळी त्यांच्या वाढदिवसानिमित्त आपण जाणून घेणार आहोत त्यांच्या लव स्टोरी बद्दल…
रजनिकांत हे जरी अॅक्शन हिरो म्हणून प्रसिद्ध असले तरी ते त्यांच्या होम मिनिस्टरच्या सल्ल्याशिवाय कोणतंही काम करत नाहीत. या होम मिनिस्टर म्हणजे त्यांच्या पत्नी लता. पण लता रंगाचारी आणि रजनीकांत यांची भेट आणि प्रेमाची स्टोरी अगदी इंटरेस्टिंग आहे. कारण सुपरस्टार असलेल्या रजनिकांत यांची मुलाखत घेण्यासाठी कॉलेजगर्ल असलेल्या लता आल्या होत्या.
लोकसभेसोबत वाजणार जम्मू-कश्मीर निवडणुकांचे बिगुल? सुप्रीम कोर्टाचे दोन मोठे निर्देश
थिल्लूमल्लू चित्रपटाचं शुटींग सुरू होतं. तेव्हा लता त्याच्या कॉलेजच्या मॅग्झिनसाठी रजनिकांत यांची मुलाखत घ्यायला सेटवर आल्या होत्या. हाच तो क्षण होता जेव्हा लता आणि रजनिकांत यांची नजरानजर झाली आणि त्यांच्यात आधी मैत्री मग प्रेम आणि नंतर त्यांनी लग्नगाठ बांधली. 1981 ला हे दोघे तिरूपती मंदिरामध्ये विवाहबद्ध झाले.
या मुलाखतीचा किस्सा सांगितला जातो की, या मुलाखतीमध्ये बंगळुरू या एकाच शहरातील असल्याने लता आणि रजनिकांत यांच्यामध्ये खूप गप्पा झाल्या. याहून आश्चर्च म्हणजे मुलाखत संपताच रजनि यांनी लता यांना थेट प्रपोजच केलं. त्यांना धक्काट बसला मात्र आपण घरी आई-वडिलांना या बद्दल विचारून सांगणार असल्याचं सांगितलं. त्यांनंतर त्यांचे फोन कॉल सुरू झाले. तर दुसऱ्या भेटी नंतर त्यांनी लग्न केलं. रजनिकांत आणि लता यांना ऐश्वर्या आणि सौंदर्या या दोन मुली आहेत.