केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाची पुनर्रचना; 18 सदस्यांचा समावेश

New CBFC Board : महाराष्ट्रातून निशिगंधा वाड आणि रंगभूमी क्षेत्रातील वामन केंद्रे यांचा समावेश या मंडळात करण्यात आला आहे.

  • ganesh pokale
  • Written By: Published:
News Photo   2026 09 16T195403.201

New CBFC Board : केंद्र सरकारने केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाची (CBFC) पुनर्रचना केली आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने 16 सप्टेंबर 2026 रोजी यासंदर्भात अधिसूचना जारी केली. पुनर्रचित मंडळाचा कार्यकाळ तत्काळ प्रभावाने 3 वर्षे किंवा पुढील आदेशापर्यंत, यापैकी जे आधी होईल तोपर्यंत राहणार आहे.

सिनेमॅटोग्राफ अधिनियम, 1952 मधील कलम 3 च्या उपकलम (1) तसेच सिनेमॅटोग्राफ (प्रमाणन) नियमावली, 2024 मधील नियम 3 अंतर्गत मिळालेल्या अधिकारांचा वापर करून सरकारने हा निर्णय घेतला आहे. नव्या मंडळात एकूण 18 सदस्यांचा समावेश करण्यात आला असून, चित्रपट, संगीत, कला, साहित्य आणि मनोरंजन क्षेत्रातील प्रमुख व्यक्तींना स्थान देण्यात आले आहे.

SIIMA पुरस्कारांमध्ये होम्बले फिल्म्सच्या ‘कांतारा’चा दमदार जलवा, तब्बल 9 पुरस्कारांवर कोरले नाव

या यादीत सुनील शेट्टी, प्रीती झिंटा, पंकज त्रिपाठी, पल्लवी जोशी, रूपाली गांगुली, प्रियदर्शन आणि प्रोसेनजीत चॅटर्जी यांसारख्या चित्रपट व मनोरंजन क्षेत्रातील परिचित नावांचा समावेश आहे. संगीत क्षेत्रातून ग्रॅमी पुरस्कार विजेते रिकी केज, तर गायक व राजकीय क्षेत्राशी संबंधित हंसराज हंस यांचाही समावेश करण्यात आला आहे.

महाराष्ट्रातून निशिगंधा वाड आणि रंगभूमी क्षेत्रातील वामन केंद्रे यांचा समावेश या मंडळात करण्यात आला आहे. साहित्यिक यतींद्र मिश्रा, चित्रपट दिग्दर्शक नीला माधब पांडा, तसेच इतर विविध क्षेत्रातील व्यक्तींनाही मंडळात स्थान देण्यात आले आहे.

नव्या मंडळातील १८ सदस्य

अधिसूचनेतील क्रमवारीनुसार मंडळात पुढील व्यक्तींचा समावेश आहे

1. विनोद अनुपम
2. मनोज जोशी
3. अभिषेक जैन
4. रिकी केज
5. प्रियदर्शन
6. सुनील शेट्टी
7. हंसराज हंस
8. सुप्रिया यार्लगड्डा
9. यतींद्र मिश्रा
10. रूपाली गांगुली
11. प्रीती झिंटा
12. नीला माधब पांडा
13. पंकज त्रिपाठी
14. प्रोसेनजीत चॅटर्जी
15. पल्लवी जोशी
16. निशिगंधा वाड
17. वामन केंद्रे
18. रमेश पतंगे

follow us