Toxic: A Fairy Tale for Grown-ups मुलांसाठी नाही; ‘टॉक्सिक’ चित्रपटाबद्दल काय म्हणाला ‘रॉकिंग स्टार’ यश?
Toxic: A Fairy Tale for Grown-ups : आपल्या आगामी चित्रपट 'टॉक्सिक: अ फेअरी टेल फॉर ग्रोन-अप्स' (Toxic: A Fairy Tale for Grown-ups) मुळे
Toxic: A Fairy Tale for Grown-ups : आपल्या आगामी चित्रपट ‘टॉक्सिक: अ फेअरी टेल फॉर ग्रोन-अप्स’ (Toxic: A Fairy Tale for Grown-ups) मुळे सोशल मीडियावर चर्चेत असणारा अभिनेता ‘रॉकिंग स्टार’ यशने या चित्रपटाबाबत मोठा खुलासा केला आहे. हा चित्रपट मुलांसाठी नाही. मुलांनी चित्रपट पाहू नये आवाहन त्याने केल्याने अनेक चर्चांना उधाण आले आहे. रजत शर्मा यांच्या ‘आप की अदालत’ या कार्यक्रमात बोलताना त्याने चित्रपटाबाबत अनेक खुलासे केले आहे.
या कार्यक्रमात बोलताना यश म्हणाला की, हा चित्रपट केवळ एक पारंपरिक स्टोरी नाही. तर तो मानवी स्वभावाच्या अशा खोलवरच्या आणि अस्वस्थ करणाऱ्या पैलूंचा वेध घेतो, जे सहसा कथाकथनात फारसे मांडले जात नाहीत. तर यावेळी त्याने आपल्या पात्राचा प्रत्येक पैलू पूर्ण प्रामाणिकपणे मांडण्याच्या महत्त्वावर भर दिला. तो म्हणाला, चित्रपटाची स्टोरी ज्या दिशेने जाईल तिथे या पात्राचा प्रत्येक पैलू समजून घेणे आणि मांडणे आवश्यक आहे आणि माझ्यासाठी, अशी स्टोरी शक्य तितक्या अस्सल पद्धतीने सांगितली गेली पाहिजे. ही स्टोरी एक व्यक्ती म्हणून माझ्या स्वतःच्या मर्यादांच्याही पलीकडे जाणारी आहे.
तर दुसरीकडे या स्टोरीच्या टॅगलाइनबद्दलही बोलताना तो म्हणाला की, ही टॅगलाइन चित्रपटाची शैली आणि स्टोरीचे स्पष्ट संकेत देते. मी टायटल निश्चित केले तेव्हाच ही टॅगलाइनही समाविष्ट केली होती. ही प्रौढांसाठीची एक परीकथा आहे. चित्रपट कोणासाठी आहे (target audience) याबद्दल बोलताना यशने स्पष्ट केले की, ‘टॉक्सिक’ मुलांच्या मनोरंजनासाठी बनवलेला नाही. तो म्हणाला, मुलांनी हा चित्रपट पाहू नये. तो त्यांच्यासाठी बनवलेला नाही. मुलांनी घरीच राहावे. हे अगदी स्पष्ट आहे. आम्ही हा चित्रपट मुलांसाठी बनवलेला नाही.
… तर गोपीनाथ मुंडेंचे प्राण वाचले असते; पृथ्वीराज चव्हाणानंतर संजय राऊतांचा मोठा दावा
यशच्या मते, ‘टॉक्सिक’ ही एक गुंतागुंतीची आणि अनेक पदर असलेली स्टोरी आहे, जिचा अर्थ प्रेक्षक आपापल्या दृष्टिकोनातून लावू शकतात आणि अनुभवू शकतात. या चित्रपटातील पात्रे आणि त्यांचे जग पाहण्याचा अनुभव प्रत्येक प्रेक्षकासाठी वेगळा असू शकतो. ‘टॉक्सिक: अ फेअरी टेल फॉर ग्रोन-अप्स’ हा चित्रपट 26 ऑगस्ट 2026 रोजी जगभरात प्रदर्शित होणार आहे.