‘Singham Again’ शूटिंगचा मुहूर्त ठरला; रोहित अन् अजयची जोडी पुन्हा दिसणार एकत्र 

‘Singham Again’ शूटिंगचा मुहूर्त ठरला; रोहित अन् अजयची जोडी पुन्हा दिसणार एकत्र 

Singham Again: रोहित शेट्टीचा (Rohit Shetty) आगामी ‘सिंघम अगेन’ (Singham Again) सिनेमाची चांगलीच चर्चा सुरु होती. आता या सिनेमाबद्दल  नवीन माहिती समोर आली आहे. या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात झाल्याची माहिती देण्यात आली आहे. मुहूर्ताचे फोटो सध्या सोशल मीडियावर (Social media) व्हायरल होत आहे. रोहित शेट्टीने त्याच्या इन्स्टाग्रामवर पोस्ट (Instagram Post ) करत याविषयीची माहिती दिली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Rohit Shetty (@itsrohitshetty)


रोहित शेट्टीने पोस्टमध्ये सांगितलं आहे की, “सिंघम, सिंघम रिटर्न, सिम्बा, सूर्यवंशी…१२ वर्षांपूर्वी, आम्ही सिंघम बनवला होता. तेव्हा एक कॉप युनिव्हर्स निर्माण होईल, असे आम्हाला कधी वाटत नसल्यचे त्यांनी यावेळी सांगितले होते. परंतु, आज आम्ही सिंघम अगेनचे शुटिंगला सुरूवात करत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे. कॉप फ्रँचायझी मधील हा ५ वा सुपरहिट सिनेमा ठरणार आहे. हा सिनेमा बनवण्यासाठी आम्ही जिवापाड मेहनत करत आहोत. फक्त तुमचं प्रेम आणि आशिर्वाद असू द्या’, असे यावेळी रोहित शेट्टीने आपल्याला पोस्ट मध्ये लिहिले आहे.

या पोस्टवर देखील चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असल्याचे बघायला मिळत आहे. रोहित शेट्टीने ‘सिंघम अगेन’च्या मुहूर्ताच्या दरम्यानची काही फोटो शेअर केले आहेत. या रणवीर आणि अजय देवगन असल्याचे देखील दिसत आहे. रणवीर हा सिम्बा लूकमध्ये दिसत आहे. तर खिलाडी हा पुजेला उपस्थित नसल्याने त्याने पोस्ट करत ‘या फ्रेममध्ये मी शरीराने नाही परंतु मनाने मी इथेच असल्याचे त्याने यावेळी सांगितले आहे. रोहित शेट्टीचा २०११ मध्ये ‘सिंघम’ प्रदर्शित करण्यात आला. या सिनेमाला जोरदार प्रतिसाद मिळाल्यावर २०१४ साली ‘सिंघम २’ चाहत्यांच्या भेटीला आला आहे. आता १० वर्षांनी ‘सिंघम ३’ म्हणजे ‘सिंघम अगेन’ चाहत्यांच्या भेटीला येणार आहे.

Shabana Azmi B’day: दोन लेकरांचा बाप अन् जावेद अख्तर यांच्यासोबत लग्न; जाणून घ्या अभिनेत्रीची लव्हस्टोरी…

२०२४ मध्ये रोहित शेट्टीचा हा सिनेमा प्रदर्शित होणार असल्याची चर्चा सध्या जोरदार सुरु आहे. तसेच सोबतच ‘सिम्बा’ आणि ‘सूर्यवंशी’ हे देखील रोहितच्या कॉप युनिव्हर्सचे सिनेमा ठरले आहे. आता सिंघम अगेनमध्ये बाजीराव सिंघम, सिंबा आणि सूर्यवंशी अशी तीन पात्र आपल्याला एकाच वेळी बघायला मिळणार आहेत. तसेच ‘सिंघम अगेन’ या सिनेमामध्ये बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणची देखील झलक बघायला मिळणार आहे. अजय देवगनच्या बहिणीच्या भूमिकेमध्ये ती बघायला मिळणार आहे. तर करीना कपूरदेखील या सिनेमामध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहे. विशेष म्हणजे या सिनेमात अभिनेता अर्जुन कपूर खलनायकाच्या भूमिकेमध्ये दिसणार आहे. यामुळे आता चाहत्यांची देखील उत्सुकता वाढत असल्याचे बघायला मिळत आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube