सलमान खानच्या ‘बॅटल ऑफ गलवान’चा नवा अवतार; आता ‘मातृभूमी: में वॉर रेस्ट इन पीस’ नावाने येणार
Salman Khan यांच्या सलमान खान फिल्म निर्मित बहुचर्चित ‘बॅटल ऑफ गलवान’ या चित्रपटाचे अधिकृतपणे नवे नाव जाहीर करण्यात आले आहे.
Salman Khan’s ‘Battle of Galwan’ Now will be titled ‘Matribhumi: Mein War Rest in Peace’ : सलमान खान यांच्या सलमान खान फिल्म निर्मित बहुचर्चित ‘बॅटल ऑफ गलवान’ या चित्रपटाचे अधिकृतपणे नवे नाव जाहीर करण्यात आले आहे. आता हा चित्रपट ‘मातृभूमी: मे वॉर रेस्ट इन पीस’ या नावाने प्रदर्शित होणार आहे. निर्मात्यांनी चित्रपटाचा एक दमदार नवीन पोस्टरही शेअर केला आहे, ज्यातून केवळ नावातील बदलच नाही तर आजच्या जगासाठी अत्यंत महत्त्वाचा संदेशही देण्यात आला आहे.
‘कथा 2026’: सलाम बॉम्बे फाउंडेशनतर्फे वंचित विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेचा भव्य आविष्कार
या नव्या शीर्षकातील सर्वात खास गोष्ट म्हणजे त्याची टॅगलाइन “में वॉर रेस्ट इन पीस” .या विचारातून सलमान खान यांनी एक मोठा आणि अर्थपूर्ण संदेश दिला आहे. हा संदेश फक्त युद्ध किंवा संघर्षापुरता मर्यादित नसून, संपूर्ण जगात शांततेची आशा व्यक्त करणारा आहे. हा चित्रपट गलवान वॅली मधील ऐतिहासिक घटनेपासून प्रेरित असला तरी, त्याच्या नावामागील संदेश रणभूमीच्या सीमांपलीकडे जाऊन मानवतेसाठी शांततेचा विचार मांडतो.
लय भारी अंदाज! चॅटजीपीटीपासून ग्रोकपर्यंत, 4 दिग्गज AI ने सांगितली युद्धविरामाची फायनल डेट!
‘मातृभूमी: मे वॉर रेस्ट इन पीस’ या चित्रपटाच्या माध्यमातून सलमान खान एक प्रभावी विचार प्रेक्षकांसमोर मांडत आहेत, जो लोकांच्या मनाला भिडत आहे. या घोषणेनंतर सोशल मीडियावर मोठी चर्चा सुरू झाली असून, चित्रपटाच्या नावामागील ताकदवान भावना आणि या धाडसी निर्णयाचे अनेक जण कौतुक करत आहेत.
