देशात पूर्वीसारखी शांतता नाही भरकार्यक्रमात वक्तव्य; जे बोललो ते स्क्रप्टेड आणि… संजय दत्तचं स्पष्टीकरण

Sanjay Dutt ने शेखर सुमनच्या शोमध्ये देशात पूर्वीसारखी ‘शांतता’ जाणवत नसल्याचे म्हटले होते. या वक्तव्यावर त्याने स्पष्टीकरण दिले आहे.

Sanjay Dutt Birthday

Sanjay Dutts clarification on statement no peace in country like there used to be at Shekhar sumans show : गांधी जयंतीनिमित्त अभिनेता संजय दत्त अभिनेते शेखर सुमनच्या ‘शेखर टुनाइट’ या टॉक शोमध्ये सहभागी झाला होता. यावेळी देशातील सध्याच्या परिस्थितीवर भाष्य करताना संजय दत्तने आता देशात पूर्वीसारखी ‘शांतता’ जाणवत नसल्याचे म्हटले होते. त्याच्या या वक्तव्यावर सोशल मीडियावर काही नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर आता संजय दत्तने आपल्या वक्तव्याबाबत स्पष्टीकरण दिले आहे.

संजय दत्त काय म्हणाला?

रविवारी संध्याकाळी संजय दत्त यांनी आपल्या X अकाउंटवर पोस्ट शेअर करत शोमध्ये केलेल्या वक्तव्याचा संदर्भ स्पष्ट केला. त्यांनी म्हटले, “माझा हेतू कधीही कोणत्याही व्यक्ती, समाज किंवा संस्थेच्या भावना दुखावण्याचा, नाराज करण्याचा किंवा त्यांचा अनादर करण्याचा नव्हता. मी जे काही बोललो ते एका स्क्रिप्टेड संवादाचा भाग होता. या संवादाचा उद्देश हलका-फुलका आणि विनोदी ठेवण्याचा होता. ‘मुन्ना भाई’सारख्या चित्रपटांमध्ये ज्या पद्धतीने विनोद आणि उपरोधाचा वापर केला जातो, त्याच भावनेतून या गोष्टी मांडल्या होत्या. विशेषतः ‘गांधीगिरी’च्या संकल्पनेतून प्रेम, आपलेपणा, एकता आणि सद्भावनेचा संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र, माझ्या बोलण्याचा अर्थ त्या संदर्भापासून वेगळा काढला गेला, याचे मला वाईट वाटते.”

नेमकं प्रकरण काय होतं?

संजय दत्तने ‘मुन्ना भाई एमबीबीएस’मधील आपल्या व्यक्तिरेखेच्या शैलीत काही विनोदी टिप्पणी केली होती. यावेळी त्यांनी देशातील परिस्थितीवर भाष्य करताना भारतात आता पूर्वीसारखा सुकून का जाणवत नाही, याबद्दलही मत व्यक्त केले.तो म्हणाला होता, “या देशातील लोक खूप चांगले आहेत. इथे शांतता असायला हवी. मला आता आपल्या देशात पूर्वीसारखी शांतता जाणवत नाही. आपण भारतीय मोठ्या मनाचे आणि पाहुणचार करणारे लोक आहोत. आपण जगाला खूप काही दिलं आहे आणि भविष्यातही आपली हीच ओळख कायम राहायला हवी. मी भगवान शिवाकडे प्रार्थना करतो की तो काळ लवकरच पुन्हा यावा.”

संजय दत्त यांचा ‘पंतप्रधान’ होण्याचा मजेशीर अंदाज

संजय दत्त यांच्याकडे यूएईचा 10 वर्षांचा गोल्डन व्हिसा आहे. त्यांची पत्नी मान्यता दत्त आणि त्यांची जुळी मुले शहरान आणि इकरा दुबईत राहतात. कामानिमित्त संजय दत्त यांचे मुंबई आणि दुबईदरम्यान येणे-जाणे सुरू असते. शोच्या आणखी एका भागात संजय दत्तला पाच मिनिटांसाठी स्वतःला देशाचे पंतप्रधान समजून जनतेशी संवाद साधण्यास सांगण्यात आले. त्यानंतर त्याने ‘मुन्ना भाई’च्या शैलीतच आपल्या खास अंदाजात भाष्य केले.

World Championship of Legends : ऑक्टोबर महिन्यात दुसऱ्यांदा भिडणार भारत – पाकिस्तान; ‘या’ दिवशी होणार सामना

यावेळी त्याने देशाच्या पंतप्रधानांची भूमिका साकारताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परदेश दौऱ्यांवर अप्रत्यक्षपणे विनोदही केला. ते म्हणाले, “एवढा मोठा देश आहे, इतके सारे लोक आहेत आणि आता या सगळ्यांची जबाबदारी माझ्यावर आहे. पण तुम्हाला अजिबात काळजी करण्याची गरज नाही. या आनंदाचा उत्सव साजरा करण्यासाठी मी परदेशात जाणार नाही. मी इथेच, तुम्हा सगळ्यांच्या मध्ये राहणार आहे. नाहीतर पंतप्रधान आणि जनतेमधला संपर्क कसा राहणार?” संजय दत्तच्या या वक्तव्यावर सोशल मीडियावर चर्चा सुरू झाल्यानंतर त्यांनी आपल्या मूळ विधानाचा संदर्भ स्पष्ट करत आपला हेतू कोणत्याही व्यक्ती, समाज किंवा संस्थेच्या भावना दुखावण्याचा नसल्याचे स्पष्ट केले आहे.

 

follow us