Rani Mukerji: चित्रपट ‘ब्लॅक’च्या ओटीटी रिलीजवर राणी मुखर्जीने थेटच सांगितलं, म्हणाली…

Rani Mukerji: चित्रपट ‘ब्लॅक’च्या ओटीटी रिलीजवर राणी मुखर्जीने थेटच सांगितलं, म्हणाली…

Rani Mukerji: संजय लीला भन्साळी (Sanjay Leela Bhansali) दिग्दर्शित या चित्रपटात महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी राणी मुखर्जीसोबत (Rani Mukerji) काम केले होते. ब्लॅकला (Black Movie) नुकतीच 19 वर्षे पूर्ण झाली आणि सेलिब्रेशन करण्यासाठी निर्मात्यांनी हा चित्रपट नेटफ्लिक्सवर रिलीज केला. OTT वर लाँच झाल्यापासून, राणीला जगभरातील चाहत्यांकडून आणि चित्रपटप्रेमीं कडून उत्तम प्रतिक्रिया मिळत आहेत.

राणी म्हणते, “ब्लॅकला 19 वर्षांनंतरही प्रेक्षकांकडून खूप प्रेम मिळत आहे हे पाहणे खूप जबरदस्त आणि आनंददायी आहे. माझ्या फिल्मोग्राफीमध्ये या चित्रपटाला विशेष स्थान आहे. दिग्गज अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करण्याचा आणि माझे सर्वकाळचे आवडते चित्रपट निर्माता संजय लीला भन्साळी दिग्दर्शित करण्याचा अनुभव माझ्यासोबत कायम राहील.

ती पुढे म्हणते, “मला आनंद आहे की हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला आहे आणि ज्यांनी 19 वर्षांपूर्वी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झालेल्या ब्लॅकची जादू पाहण्यास चुकले होते ते सर्व त्यांच्या स्क्रीनवर पाहून त्याचे साक्षीदार होऊ शकतील. तुमचे काम अधिकाधिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचते हे पाहणे नेहमीच सुखद असते.

Shambhu Song: अक्षय कुमार शिव शंभूच्या वेषात गाताना अन् नाचताना दिसला, व्हिडिओ व्हायरल

गेल्या काही दिवसापूर्वी अभिनेत्री करिना कपूर खान सध्या तिच्या चॅट शोमुळं चर्चेत आली आहे. तिच्या या शोमध्ये अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली आहे. रितेश-जिनिलिया देशमुख, रानी मुखर्जी ,कपिल शर्मा, शेफाली शाह, भारती सिंग अशा अनेक सेलिब्रिटींनी करिनाच्या वॉट वुमेन वॉन्ट्स या शोमध्ये हजेरी लावली आहे. पण या सगळ्यात राणी मुखर्जी हिची मुलाखत खास ठरली होती.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज