Ticket Booking : बॉक्स ऑफिसवर ‘जवान’चा अनोखा विक्रम; पहिल्याच दिवसाअखेर तब्ब्ल एवढ्या तिकिटांची विक्री

  • Written By: Published:
Ticket Booking : बॉक्स ऑफिसवर ‘जवान’चा अनोखा विक्रम; पहिल्याच दिवसाअखेर तब्ब्ल एवढ्या तिकिटांची विक्री

Jawan Ticket Booking: जवान या सिनेमाची गेल्या काही दिवसांपासून चांगलीच उत्सुकता लागली होती. किंग खानचा ‘जवान’ (Jawan) सिनेमा अखेर चाहत्यांच्या भेटीला आला आहे. ७ सप्टेंबर दिवशी किंग खानचा (Saharukh Khan) ‘जवान’ हा सिनेमा प्रदर्शित करण्यात आला. (Jawan Review) तर प्रदर्शित झाल्यावर जवळपास अडीच लाख तिकिटांची विक्री झाल्याचे समोर आले आहे. (Jawan Box Office Collection) यामुळे प्रेक्षकांची या सिनेमासाठी चांगलीच उत्सुकता लागल्याचे पाहायला मिळत आहे.

या सिनेमाच्या प्रदर्शितच्या अगोदरच १ लाख ६० हजार तिकीटांची विक्रमी विक्री केल्याचे बघायला मिळत आहे. दरम्यान किंग खानच्या आतापर्यंतच्या सिनेमापैकी या सिनेमाची झालेली आगाऊ विक्री ही सर्वोच्च असल्याचं सांगण्यात येत आहे. यामुळे या सिनेमाचा ब्लॉगबस्टर होण्याच्या दिशेने सुखाचा प्रवास सुरु झाला आहे. गुरुवार ७ सप्टेंबर दिवशी जवान हा सिनेमा चाहत्यांच्या भेटीला आला आहे. तर पहिल्या दिवशी या सिनेमाने १९.३५ कोटींची कमाई केली आहे.

पठाण सिनेमाने पहिल्या दिवशी केलेल्या कमाईपेक्षा ही कमाई मात्र कमी असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे जरी तिकीटांची विक्रमी विक्री झाली असली, तरी कमाईमध्ये पठाणला मागे टाकण्यात जवान हा कमी पडला असल्याचे सांगितले जात आहे. आता तिकीट विक्रीमध्ये जरी जवानने अनोखा विक्रम केला असला, तरी पठाणच्या कमाईचे रेकॉर्ड मोडणार का? हे बघणं आता महत्त्वाचे असणार आहे. तसेच या सिनेमाने हिंदीसह अनेक भाषांमध्ये प्रदर्शित करण्यात आला आहे.

Jawan Box Office Collection: किंग खानच्या चित्रपटाने पहिल्याच दिवशी रचला इतिहास; कमावले ‘इतके’ कोटी

मुंबई, दिल्ली आणि हैद्राबादसह अनेक शहरात या सिनेमाने जोरदार कमाई करण्यास सुरुवात केली आहे. या सिनेमामधील कलाकार, दिग्दर्शन, कथानक, कलादिग्दर्शन, संगीत आणि इतर काही महत्त्वपूर्ण गोष्टींना या सिनेमाला अगदी चार चांद लागल्याचे बघायला मिळत आहे. तसेच सध्या ‘जवान’ची ७ लाखांहून अधिक तिकिट अ‍ॅडव्हांस बुकिंगमध्ये विकली गेल्याची देखील माहिती मिळाली होती. या सिनेमाने अ‍ॅडव्हांस बुकिंगच्या ३ दिवसामध्येच सुमारे २१.१४ कोटीचा गल्ला कमावला आहे. ‘जवान’ या सिनेमात किंग खानबरोबर नयनतारा, सान्या मल्होत्रा, रिद्धी डोगरा यांसारख्या अभिनेत्रीही झळकले आहे. दीपिका पदुकोण, विजय सेतुपती हे कलाकार देखील सिनेमात दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shah Rukh Khan (@iamsrk)

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube