Upcoming Movie : ‘हा’ व्हिडीओ शेअर करत अक्षयने मानले टायगरचे आभार…
मुंबई : अभिनेता अक्षय कुमार सध्या ‘बडे मिया छोटे मिया’ या चित्रपटाच्या शुटींगमध्ये व्यस्त आहे. यामध्ये अभिनेता अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ हे दाघे मुख्य भूमिकेत आहेत. या शुटींग दरम्यान फीटनेट फ्रीक असलेले हे दोघे आणि टीम सेटवर व्हॉली बॉल खेळतानाचा एक व्हिडीओ अक्षयने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केला आहे.
ही पोस्ट करताना अक्षयने आपली भावना व्यक्त केल्या आहेत. तो म्हणाला, ‘मी कधीही पत्र लिहीत नाही पण आज एक खास मुद्दा मांडावा वाटला आहे. 32 वर्षांपुर्वी मी अॅक्शन चित्रपटाने मी माझ्या करिअरला सुरूवात केली. त्या दशकांमध्ये मी सर्व काही केले. पण ‘बडे मिया छोटे मिया’ या प्रोजेक्टने 15 दिवसांत मला खूप काही शिकवले. शारिरीक आणि मानसिक.
सिड-कियाराच्या रिसेप्शनमध्ये भूमीचा हॉट लूक !
वेदना, जखमा, मोडलेले हाड, हे माझ्यासाठी नवीन नाही. पण याआधी कधीही मी माझ्या कम्फर्ट झोनच्या बाहेर पडलो नव्हतो. अली अब्बस जफर आणि टीमने केलं. रोज फिजीओथेरपी सुरू आहे. मी तक्रार करत नाही. कारण जीवनातील जादू ही नेहमी कम्फर्ट झोनच्या बाहेर असते. जेव्हा आपण जोर लावतो तेव्हा पर्वत देखील ढकलू शकतो. त्यामुळे मी सर्व इन्जॉय करायचंय.
तेरे साथ ये शूट करके बढिया महसूस हो रहा है, टायगर. आम्ही स्टंट करतो, आम्ही फिटनेसवर बोलतो, आम्ही व्यायाम करतो आणि नंतर आम्ही क्रॅश होईपर्यंत व्हॉलीबॉल खेळतो. मला टवटवीत वाटते, मला आतून तरूण वाटते आणि फिटनेसची ही लाट मला जाणवते की माझं 55 हे वय आहे. त्यामुळे, मला प्रेरणा दिल्याबद्दल, मला आव्हान दिल्याबद्दल आणि मला आनंदी वाटण्यासाठी @tigerjackieshroff धन्यवाद. तुमचे आणि बडे मियाँ छोटे मियाँ च्या संपूर्ण टीमला माझे प्रेम आणि आशीर्वाद आहेत. चिअर्स, अक्षय.