‘VVAN’ च्या BTS फोटोमध्ये सिद्धार्थ मल्होत्रा–तमन्ना भाटियाची जबरदस्त केमिस्ट्री
Tamannah Bhatia : ‘VVAN’ ची घोषणा झाल्यापासूनच हा चित्रपट सातत्याने चर्चेत आहे. प्रेक्षक या प्रोजेक्टशी संबंधित अधिक अपडेट्सची आतुरतेने
Tamannah Bhatia : ‘VVAN’ ची घोषणा झाल्यापासूनच हा चित्रपट सातत्याने चर्चेत आहे. प्रेक्षक या प्रोजेक्टशी संबंधित अधिक अपडेट्सची आतुरतेने वाट पाहत होते आणि नुकताच रिलीज झालेला इंट्रिगिंग टीझर त्याच्या मिस्टिकल वर्ल्डची झलक दाखवतो. समृद्ध सांस्कृतिक पार्श्वभूमीवर आधारित एका वेगळ्या लोककथेचा हा थरारक अनुभव आहे. या वाढत्या उत्सुकतेत आता सिद्धार्थ मल्होत्रा (Siddharth Malhotra) आणि तमन्ना भाटिया (Tamannah Bhatia) यांची पहिल्यांदाच एकत्र ऑन-स्क्रीन झळकणारी जोडी समोर आली असून, त्यांच्या फ्रेश केमिस्ट्रीची झलक चाहत्यांना भुरळ घालत आहे. ज्याची गरज होती हे कदाचित कोणालाच माहीत नव्हतं.
‘VVAN’ च्या सेटवरून समोर आलेला सिद्धार्थ आणि तमन्नाचा हा BTS मोमेंट नजरेआड करणं कठीण आहे. ही अगदी नवी ऑन-स्क्रीन जोडी अत्यंत मोहक दिसते आणि त्यांच्यातील उबदारपणा व चार्म स्पष्टपणे जाणवतो. पहिल्यांदाच एकत्र दिसणाऱ्या या जोडीकडून युथफुल आणि एनर्जेटिक वाइब्स मिळतात, जे पाहताक्षणीच मन जिंकतात. या झलकमुळे चित्रपटाबद्दलचा बज आणखी वाढला आहे. या फ्रेश जोडीने आधीच चाहत्यांमध्ये जबरदस्त एक्साइटमेंट निर्माण केली आहे. सिद्धार्थ आणि तमन्नाला एकाच फ्रेममध्ये पाहण्याची चाहत्यांची दीर्घकाळापासूनची इच्छा होती. या BTS क्षणातील त्यांची क्रॅकलिंग केमिस्ट्री सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असून, चित्रपटाबद्दलच्या अपेक्षा आता आणखी उंचावल्या आहेत.
चित्रपटाच्या स्केल आणि इंट्रीगला अधिक बळ देणारी गोष्ट म्हणजे ‘VVAN’ हा कंटेंट वर्ल्डमधील दोन मोठ्या पावरहाऊसेस एकता कपूरची बालाजी टेलीफिल्म्स आणि अरुणाभ कुमारची TVF (द वायरल फीवर) यांच्यातील महत्त्वाचा कोलॅबोरेशन आहे. ही एक्साइटिंग पार्टनरशिप दमदार स्टोरीटेलिंग आणि उच्च दर्जाच्या कंटेंटचं आश्वासन देते. विशेष म्हणजे, फीचर फिल्म्समध्ये TVFची ही पहिलीच एंट्री आहे. फोक थ्रिलर जॉनरमधील ‘VVAN’ ही एक रेअर आणि वेगळी ऑफर ठरत असून, तिच्या अनोख्या विश्वामुळे प्रेक्षकांची उत्सुकता अधिकच वाढते आहे.
अजित पवारांच्या अपघाती निधनाची राजकीय भांडवल नको…विखेंचा सल्ला-
बालाजी टेलीफिल्म्स लिमिटेडचा विभाग असलेल्या बालाजी मोशन पिक्चर्सने TVFसोबत मिळून, 11.11 प्रोडक्शनच्या बॅनरखाली ‘VVAN – Force of the Forest!’ सादर केला आहे. हा बिग-स्क्रीन फोक थ्रिलर असून सिद्धार्थ मल्होत्रा आणि तमन्ना भाटिया प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. चित्रपटाचे लेखन अरुणाभ कुमार यांनी केले असून दिग्दर्शन दीपक मिश्रा आणि अरुणाभ कुमार यांनी सांभाळले आहे. डीओपी आणि व्हिज्युअल डायरेक्टर म्हणून मनु आनंद यांची जबाबदारी आहे. शोभा कपूर, एकता आर कपूर, अरुणाभ कुमार आणि नीरज कोठारी यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. ‘VVAN’ 2026 मध्ये सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. ‘VVAN’च्या विश्वातून येणाऱ्या आणखी एक्साइटिंग अपडेट्ससाठी जोडलेले रहा.
