Park Soo Ryun Passes Away: प्रसिद्ध दक्षिण कोरियन अभिनेत्रीचा मृत्यू; पायऱ्यांवरुन खाली पडल्याने गमावला जीव

Park Soo Ryun Passes Away: प्रसिद्ध दक्षिण कोरियन अभिनेत्रीचा मृत्यू; पायऱ्यांवरुन खाली पडल्याने गमावला जीव

Snowdrop Actress Park Soo Ryun Passes Away: कोरियन अभिनेत्री पार्क सू रयून (Park Soo Ryun) हिचे पायऱ्यांवरुन खाली पडल्याने आकस्मिक निधन झालं आहे. ती 29 वर्षांची होती. मिळालेल्या माहितीनुसार 11 जून रोजी घरी जात असताना पायऱ्यांवरून तिचा पाय घसरला आणि ती खाली पडली होती. त्यानंतर तिला लगेचच हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले होते. पायऱ्यांवरुन पडल्याने तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले, तरीदेखील त्यांचे सर्व प्रयत्न अयशस्वी ठरले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by 박수련 (@su.ryeon_p)


पार्कला ब्रेन डेड घोषित करण्यात आले. दरम्यान ज्या दिवशी पॉर्कचा अपघात झाला, त्याच्या एका दिवसानंतर जेजू बेटावर ती परफॉर्म करणार होती. पार्कच्या जाण्याने कोरियन इंडस्ट्रीवर मोठा शोककळा पसरला आहे. पार्क स्नोड्रॉप (Snowdrop South Korean TV Series) या वेब सिरीजमुळे जगभरात ती प्रसिद्ध झाली होती. कोरियन अभिनेत्री पार्क सू रयूनच्या आकस्मिक निधनानं जगभरात तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. डॉक्टरांनी अभिनेत्रीला ब्रेन डेड घोषित केल्याची माहिती मीडिया रिपोर्ट्समधून सांगण्यात येत आली आहे.

आज 13 जून रोजी पार्कवर अंत्यसंस्कार होणार आहेत. पार्कने अनेक कोरियन शो केले आहेत. मात्र तिला खरी ओळख मिळाली होती, ती म्हणजे तिच्या स्नोड्रॉप या कोरियन टीव्ही सीरिजमुळे. स्नोड्रॉपमध्ये पार्कची भूमिका अगदी काही वेळाची आहे. पण पार्क आपल्या अभिनयाच्या जोरावर अनेकांवर मोठी छाप पाडली आहे. भारतात देखील पार्कची स्नोड्रॉप ही सीरिज खूप मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध झाली होती. अभिनेत्री पार्क सू रयून हिच्या कुटुंबानं तिचे अवयव दान करण्याचा मोठा निर्णय देखील घेतला आहे.

Kazan Khan : प्रसिद्ध खलनायक कझान खान यांचं ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन

मिळालेल्या माहितीनुसार, पार्कच्या आईने सांगितले आहे की, ‘पार्कचा मृत्यू ब्रेन डेडमुळे झाला आहे. तिचे हृदय अजून धडधडत आहे. जगात कोणीतरी नक्कीच असेल ज्याला अवयवांची नितांत गरज आहे. पार्कचे आई- वडील या नात्याने आम्हाला हा विचार करुन मोठा आनंद होत आहे. तिचं हृदय दुसर्‍या कोणाकडे तरी असेल आणि ते धडधडत राहिल. तसेच 2018 मध्ये अभिनेत्री पार्क सू रयूनने टेनोर मधून अभिनय क्षेत्रात आली होती.

यानंतर ती फाईंडिंग मिस्टर डेस्टिनी, द डेज वी लव्हड, सिद्धार्थ संग इतर म्युझिकल अल्बम्समध्ये दिसून आली होती. तिनं कोरियन शो ‘स्नोड्रॉप’मध्ये काम केले आहे. या शोमुळे तिला मोठी ओळख मिळाली होती. तिच्या भूमिकेबद्दल बोलत असताना अभिनेत्रीने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले होते. तिनं त्यावेळेस सांगितले होते की, शोमध्ये तिची भूमिका खूपच लहान असली, तरी तिची सेटवर खूपच काळजी घेतली जात होती. यासोबतच तिनं अभिनेता Jung Hae सोबत पुन्हा काम करण्याची संधी मिळणार असल्याची माहिती देखील तिने यावेळी दिली होती.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube