Kazan Khan : प्रसिद्ध खलनायक कझान खान यांचं ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन

Kazan Khan : प्रसिद्ध खलनायक कझान खान यांचं ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन

Kazan Khan Passed Away : आपल्या खलनायकाच्या भूमिकांसाठी प्रसिद्ध असलेले, अभिनेते कझान खान ( Kazan Khan) यांचं ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. (Passed Away ) त्यांच्या निधनाने त्यांच्या चाहत्यांना मोठा झटका बसला आहे. प्रोडक्शन कंट्रोलर आणि सिने-निर्माते एनएम बदूशा यांनी (N.M. Badusha) अभिनेते कझान खान यांच्या निधनाची बातमी दिली. त्यानंतर सोशल मिडीयावर चाहत्यांसह सेलिब्रेटींकडून शोक व्यक्त करण्यात येत आहे. ( Famous Mlyalam Actor Kazan Khan Passed Away due to Heart Attack )

देशात मोदी तर महाराष्ट्रात शिंदे, जाहिरातबाजीतून शिंदेंनी फडणवीसांना डिवचलं…

कझान खान यांनी मल्याळम आणि तमिळ चित्रपटांमध्ये काम केलं. त्यातही त्यांच्या खलनायकाच्या भूमिकांसाठी त्यांना विशेष ओळखलं जात. तर 1992 साली त्यांनी तमिळ चित्रपटात ‘सेंथमीज पाट्टू’ या चित्रपटातून पदार्पण केलं होतं. त्याचबरोबर त्यांनी कन्नड चित्रपटांमध्ये देखील काम केलं आहे. त्यामुळे मल्याळम, तमिळ आणि कन्नड अशा तब्बल 50 चित्रपटांमध्ये काम केलं.

Biporjoy Cyclone : बिपरजॉय चक्रीवादळामुळे गुजरात किनारपट्टी भागात ऑरेंज अलर्ट…

आर्ट ऑफ फायटींग (Art Of Fighting 2) या इंग्रजी चित्रपटामध्ये देखील त्यांनी काम केलं आहे. तर गेल्या आठ वर्षांपासून ते चित्रपटसृष्टीपासून दूर होते. 2015 साली आलेला ‘लैला ओ लैला’ हा त्यांचा शेवटचा चित्रपट ठरला आहे. तर त्यांच्या आगामी चित्रपटाची चाहत्यांना मोठी उत्सुकता होती. त्यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे.

त्यांच्या चित्रपटांबद्दल सांगायचं झालं तर गंधर्वम्, सीआयडी मूसा, द किंग, वर्णपाकिट, ड्रीम्स, द डॉन, मायामोहिनी, राजाधिराज, इवान मर्यादरमन, लैला ओ लैला त्यांच्या या चित्रपटांतीन भूमिका विषेश गाजला. त्याचबरोबर सेंथमीज पाट्टू या तमिळ चित्रपटातून पदार्पण केलं होतं. आर्ट ऑफ फायटींग (Art Of Fighting 2) या इंग्रजी चित्रपटामध्ये देखील त्यांनी काम केलं आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube