Squid Game 2 : ‘स्क्विड गेम 2’चा टीझर प्रदर्शित ! ‘या’ दिवशी सुरू होणार पुन्हा मृत्यूचा खेळ

Squid Game 2 : ‘स्क्विड गेम 2’चा टीझर प्रदर्शित ! ‘या’ दिवशी सुरू होणार पुन्हा मृत्यूचा खेळ

Squid Game 2 Teaser Out : ‘स्क्विड गेम’ (Squid Game 2) या बहुचर्चित वेबसीरिजचा दुसरा सीझन चाहत्यांच्या भेटीला येण्यासाठी पुन्हा सज्ज झाला आहे. पहिला सीझन चाहत्यांच्या पसंतीला उतरला होता. (Squid Game 2 teaser) तेव्हापासून चाहते या दुसऱ्या सीझनची मोठी प्रतीक्षा करत होते. या बहुचर्चित कोरियन वेबसीरिजच्या (Korean webseries) दुसऱ्या सीझनचा टीझर (second season) रिलीज करण्यात आला आहे.

‘स्क्विड गेम 2’चा टीझर सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या सीरिजचा टीझर शेअर करत रिलीज डेटदेखील जाहीर केली आहे. या नव्या सीझनमध्ये काही नवीन कलाकार देखील असल्याचे दिसून आले आहेत. ‘स्क्विड गेम 2’ नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Netflix India (@netflix_in)


नेटफ्लिक्सने ‘स्क्विड गेम 2’ या वेबसीरिजचा टीझर शेअर करत लिहिले आहे की, रेड लाईट…ग्रीन लाईट! ‘स्क्विड गेम 2’ अधिकृतरित्या चाहत्यांच्या भेटीसाठी सज्ज होत आहे. ह्वांग डोंग-ह्युक (Hwang Dong-hyuk) या सीरिजच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळत आहे. तर आता दुसऱ्या सीझनची कथा जाणून घेण्यास आणि कलाकारांचा अभिनय बघण्यास चाहते मोठ्या उत्सुकतेने वाट बघत आहेत.

‘स्क्विड गेम 2’मध्ये काही जुन्या कलाकारांबरोबर नवीन चेहरे देखील झळकणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. यामध्ये कोरियन अभिनेता आणि गायक यिम सी-वान, कांग हा-नेउल, पार्क सुंग-हून आणि यांग डोंग-जौनचा समावेश आहे. हे कलाकार या सीरिजमध्ये कोण- कोणत्या भूमिकेमध्ये झळकणार याची आता चाहत्यांना मोठी उत्सुकता लागली आहे.

Ketaki Chitale: केतकी चितळे वादग्रस्त पोस्टमुळे पुन्हा चर्चेत, आता नेमके काय झाले?

‘स्क्विड गेम’ ही ९ भागांची वेब सीरिज आहे. कर्जबाराजी मंडळींच्या आयुष्यावर भाष्य करणारा हा सिनेमा आहे. लोकांना पैशाचे आमिश दाखवत खेळात सहभागी करुन घेतले जात असते. यानंतर या सर्वाना मारण्यात येते. हा खेळ जिंकलेल्या व्यक्तीला ३८.७ मिलिअन डॉलर मिळणार असतात. आता या सीरिजच्या दुसऱ्या सीझनमध्ये काय बघायला मिळणार आहे, याची चाहत्यांना मोठी उत्सुकता लागली आहे.

‘स्क्विड गेम’ ही 2021मध्ये प्रदर्शित झालेली कोरियन सीरिज आहे. त्या वर्षात सर्वात लोकप्रिय सिरीजपैकी ती एक ठरली होती. Squid Game ही सिरीज 111 दशलक्ष वहयूजसह सर्वाधिक बघितलेली Netflix सिरीज बनली आहे. ही सिरीज Netflix मधल्या ९४ देशांपैकी पहिल्या १० मध्ये होती. या सिरीजमध्ये शेवटी असे सांगण्यात आले होते की, तिच्या पुढील सीझनचा विचार करण्यात आला आहे. परंतु आता प्रचंड लोकप्रियता बघता निर्मात्यांना ती लवकरच चाहत्यांच्या भेटीला आणली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube