‘संडे १९९६’ कोकणाच्या निसर्गरम्य भूतकाळ-वर्तमानातील सीमारेषा धूसर करणारी रहस्य कथा
Sunday 1996 हा मराठी चित्रपट भूतकाळ-वर्तमान यांच्यातील सीमारेषा धूसर करणारी ही कथा रहस्य, नाती, भावना आणि काळाच्या अनपेक्षित खेळाभोवती फिरते.
‘Sunday 1996’ mystery story set in Konkan region that blurs boundary between its picturesque past and present : मराठी चित्रपटसृष्टीने नेहमीच आपल्या वैविध्यपूर्ण आणि आशयघन कथांमधून प्रेक्षकांना नवे विषय आणि वेगळे अनुभव दिले आहेत. याच समृद्ध परंपरेत एका अनोख्या आणि उत्कंठावर्धक विषयासह ‘संडे १९९६’ हा मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. भूतकाळ आणि वर्तमान यांच्यातील सीमारेषा धूसर करणारी ही कथा रहस्य, नाती, भावना आणि काळाच्या अनपेक्षित खेळाभोवती फिरते. व्ही.आर.के फिल्मस निर्मित ‘संडे १९९६’ चित्रपटाची निर्मिती नीलांबरी विक्रांत यांनी केली असून, चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन जीवन राजेंद्र चव्हाण यांनी केले आहे.
या चित्रपटात ओंकार राऊत, गणेश यादव, पंकज विष्णू, सुनील गोडबोले, शिवानी बने, सायली पाचपुते आणि गौरवी महांगडे यांच्या प्रमुख भूमिका आहेत.राज्याचे कॅबिनेट मंत्री भरत गोगावले यांच्या हस्ते ‘संडे १९९६’ या चित्रपटाचे पोस्टर नुकतेच प्रदर्शित करण्यात आले. चित्रपटाच्या पोस्टर प्रदर्शनाच्या निमित्ताने भरतशेठ गोगावले यांनी ‘संडे १९९६’ चित्रपटाच्या संपूर्ण टीमला शुभेच्छा दिल्या.
13 व्या राष्ट्रीय सीएसआर व ईएसजी परिषदेत ‘फ्यूल’ संस्था ‘सीएसआर टाईम्स 2026’ अवॉर्डने सन्मानित
चित्रपटाच्या संकल्पनेविषयी बोलताना निर्मात्या नीलांबरी विक्रांत यांनी सांगितले, ‘‘संडे १९९६’च्या माध्यमातून आम्ही केवळ रहस्यकथा सांगण्याचा प्रयत्न केलेला नाही, तर काळ, नाती आणि त्याच्याशी संबंधित माणसाच्या आयुष्यातला भूतकाळ याकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहण्याचा प्रयत्न केला आहे . दिग्दर्शक जीवन चव्हाण सांगतात, ‘संडे १९९६’ची कथा मांडताना आमच्यासमोर सर्वातमोठं आव्हान होतं ते म्हणजे रहस्य शेवटपर्यंत टिकवून ठेवतानाच त्यामागच्या भावनिक नात्यांनाही योग्य न्याय देणं.‘प्रेक्षकांनी केवळ कथा अनुभवू नये तर सोबत त्या कथेतील प्रत्येक क्षणाची अनुभूती घ्यावी अशी आमची इच्छा आहे.
‘पॉ पेट्रोल: द डायनो मूव्ही’बद्दल जाणून घ्या सर्वकाही; 21 ऑगस्टला भारतात होणार प्रदर्शित
या चित्रपटाची आणखी एक महत्त्वाची बाजू म्हणजे या कथेला असलेली निसर्गरम्य कोकणाची पार्श्वभूमी. कोकणाचा निसर्ग जितका सुंदर आणि मनमोहक आहे, तितकाच तो आपल्या कुशीत अनेक रहस्ये आणि गूढ कथा दडवून ठेवतो. याच निसर्गरम्य आणि गूढ वातावरणाचा प्रभावी वापर ‘संडे १९९६’मध्ये करण्यात आला आहे. काळाची चक्रे जेव्हा उलटी फिरतात, तेव्हा वर्तमानात जगणाऱ्या माणसाचं आयुष्यही बदलून जातं, या मध्यवर्ती संकल्पनेवर आधारित ‘संडे १९९६’ प्रेक्षकांना अनोखा, थरारक सिनेमॅटिक अनुभव द्यायला सज्ज झाला आहे.