Sunil Shetty: सुनील शेट्टीने लेक अथियाला अन् जावयाला दिला दम; म्हणाला’ “इतकाही चांगला…”
Sunil Shetty: बॉलीवूड (Bollywood) अभिनेता सुनील शेट्टीची (Sunil Shetty) लेक अथिया शेट्टीचं (Athiya Shetty) ६ महिन्याअगोदर लग्न झाले होते. अथिया क्रिकेटपटू केएल राहुलसोबत लग्नबंधनात अडकली आहे. आता सुनीलने लेक अथियाला नातं यशस्वीरित्या टिकवण्यासाठी मोलाचा सल्ला दिल्याचे दिसून आले आहे. तर त्याने जावई केएल राहुलला (KL Rahul) धमकवल्याचे दिसत आहे.
सुनीलने लेक आणि जावयाला नेमकं कोणता कानमंत्र दिला आहे, चला मग ते जाणून घेऊया. सुनील शेट्टीने ‘मिड डे’ला (mid day) दिलेल्या मुलाखती दरम्यान आयुष्यात चढ-उतार येत असतात. परंतु या चढ-उतारांनी नाती कमकुवत होऊ नयेत, तर ती मजबूत व्हायला पाहिजे. असा सल्ला त्याने आपल्या लेक आथियाला दिला आहे. तसेच “कोणत्याही नात्यामध्ये विश्वास हा महत्त्वाचा असतो.
कारण केएल राहुल हा खेळाडू असून त्याला कामासाठी सारखे बाहेर जावं लागते. अशा परिस्थितीत तो पूर्ण वेळ तिला सोबत घेऊन जाऊ शकत नाही. म्हणूनच अथियाला त्याच्यावर विश्वास ठेवावा लागणार आहे, कारण अभिनेत्यांप्रमाणे खेळाडूंच्या आयुष्यात देखील नेहमीच अनेक प्रकारचे चढ-उतार येत असतात, असं सुनील शेट्टी यावेळी म्हणाला आहे.
‘सुनील शेट्टी सडक्या डोक्याचा माणूस, त्याच्या कटोऱ्यात सडकी टोमॅटो टाका’; सदाभाऊ चिडले!
तर दुसरीकडे सासरे सुनील शेट्टी यांनी जावई केएल राहुलला देखील चांगलाच दम दिला आहे. इतकाही चांगला बनू नकोस की तुझ्यासमोर बाकीचे तुला हीन वाटतील,” असं सुनील केएल राहुलला सुनावलं आहे. दरम्यान अथिया आणि राहुल एकमेकांसोबत खूप काळ डेट करत असल्याची माहिती होते. यावर्षी २३ जानेवारी २०२३ रोजी दोघांनी खंडाळा येथील फार्म हाऊसवर लग्न केले आहे. दोघांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ चांगलेच चर्चेत आले आहेत.