‘सुनील शेट्टी सडक्या डोक्याचा माणूस, त्याच्या कटोऱ्यात सडकी टोमॅटो टाका’; सदाभाऊ चिडले!

‘सुनील शेट्टी सडक्या डोक्याचा माणूस, त्याच्या कटोऱ्यात सडकी टोमॅटो टाका’; सदाभाऊ चिडले!

Sadabhau Khot criticized Sunil Shetti : टोमॅटोच्या वाढलेल्या दरावर ट्विट करून सर्वसामान्यांची बाजू घेणाऱ्या अभिनेता सुनील शेट्टीला (Sunil Shetti) शेतकरी नेते सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी चांगलच झोडपून काढलं आहे. तसेच त्याला सोशल मीडियावरही ट्रोल केले जात आहे. सुनील शेट्टी हा सडक्या डोक्याचा माणूस आहे. शेतकऱ्याच्या मालाला कधीतरी चांगला भाव मिळाला तर तुमच्यासारख्या जागतिक भिकाऱ्याच्या पोटात दुखतं अशी संतप्त प्रतिक्रिया खोत यांनी दिली.

टोमॅटोच्या किंमती गगनाला भिडल्या असून त्याचा परिणाम आमच्या किचनवरही होत आहे, अशा आशयाची पोस्ट बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टी याने केली होती. त्याच्या या पोस्टवर मात्र शेतकरी संतापून उठले. टोमॅटोला कधीतरी इतका चांगला भाव मिळाला. त्यामुळे शेतकऱ्याला चार पैसे जास्त मिळतील अशा भावना लोकांनी व्यक्त केल्या.

दिल्लीत खातेवाटपावर चर्चा सुरु पण.., प्रफुल्ल पटेल यांचं मोठं विधान…

दुसरीकडे रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनीही सुनील शेट्टीला निशाण्यावर घेत चांगलेच झापले. सुनील शेट्टी हा सडक्या डोक्याचा माणूस आहे. शेतकऱ्याच्या मालाला कधीतरी चांगला दर मिळाला तर तुमच्यासारख्या जागतिक भिकाऱ्याच्या पोटात दुखतं. सुनील शेट्टी तुम्ही बाजारू कलावंत आहात. सुनील शेट्टी जर भीक मागायला आला तर त्याच्या कटोऱ्यात सडकी टोमॅटो टाका, असा संताप खोत यांनी आपल्या शब्दांतून व्यक्त केला.

सुनीलच्या पोस्टमध्ये काय ?

सुनील शेट्टीने सोशल मीडियावरील पोस्टमध्ये म्हटले होते की माझी पत्नी माना शेट्टी एक ते दोन दिवसांनी भाजी खरेदी करते. कारण, आपण ताज्या गोष्टी खाण्याला महत्व देतो. आजकाल टोमॅटो खूप महाग होत आहेत. त्याचा परिणाम आपल्या किचनवरही होत आहे. त्यामुळेच मी आजकाल टोमॅटो कमी खातोय. लोकांना वाटेल की मी एक अभिनेता आहे आणि त्याचा माझ्यावर परिणाम होणार नाही. पण तसे नाही. आम्हालाही अशा गोष्टींचा त्रास सहन करावा लागतो. मी ऑनलाइन टोमॅटो ऑर्डर करतो तिथे ते स्वस्त असतील म्हणून नाही तर ऑनलाइन भाज्या या ताज्या दिल्या जातात. तसेच याचा सरळ फायदा शेतकऱ्यांनाही होतो.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube