Sunny Leone : सनी लिओनी चाहत्यांना करणार घायाळ, ‘या’ दिवशी रिलीज होणार ‘कोटेशन गँग’

Sunny Leone : सनी लिओनी चाहत्यांना करणार घायाळ, ‘या’ दिवशी रिलीज होणार ‘कोटेशन गँग’

Sunny Leone : लोकप्रिय अभिनेत्री सनी लिओनीने (Sunny Leone) बॉलीवूडमध्ये (Bollywood) अगदी कमी वेळेत आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यामुळे सनीच्या आगामी चित्रपटाची चाहत्यांना उत्सुकता आहे. तर आता चाहत्यांची प्रतीक्षा संपणार असून 30 ऑगस्ट रोजी सनी लिओनी स्टारर ‘कोटेशन गँग’ (Quotation Gang) चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

सनी या चित्रपटामध्ये एका वेगळ्या भूमिकेमध्ये दिसणार आहे. त्यामुळे या चित्रपटाबद्दल चाहत्यांना उत्सुकता आहे. सनी लिओनीच्या या चित्रपटाची वाट पाहत असणाऱ्या प्रेक्षकांसह अनेकांनी ‘कोटेशन गँग’ सारखी भूमिका निवडल्याबद्दल सनीचे कौतुक केले आहे. ‘कोटेशन गँग’ मध्ये सनी अशा महिलांची भूमिका साकारणार आहे जी कॉन्ट्रॅक्ट किलिंगमध्ये माहिर आहे.

‘कोटेशन गँग’ च्या चित्रपटाच्या ट्रेलरने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे अनेकांना या चित्रपटाची प्रतीक्षा आहे.  ‘कोटेशन गँग’ ची निवड सनीच्या चित्रपटांमध्ये काळजीपूर्वक निवड करण्याच्या तिच्या संवेदनशीलतेचा खरा-पुरावा आहे. तर या चित्रपटात अशी भूमिका दिल्याबद्दल सनीने  चित्रपट निर्मात्यांचे आभार मानले.

‘कोटेशन गँग’ ज्यामध्ये जॅकी श्रॉफ आणि प्रियामणी देखील आहेत, सनी लिओनकडे प्रोजेक्टची एक रोमांचक लाइन-अप आहे. ती ‘केनेडी’ मध्ये काम करणार आहे.

Anuradha Paudwal : ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार जाहीर

तसेच सनी एका मल्याळम चित्रपटामध्ये देखील दिसणार आहे. लवकरच या चित्रपटाचा नाव देखील जाहीर होणार आहे. याच बरोबर सनी हिमेश रेशमिया आणि प्रभुदेवासोबत एका प्रोजेक्टवर काम करणार आहे.

बबनराव पाचपुतेंना स्व पक्षातूनच आव्हान…इच्छुकांमुळे भाजपची डोकेदुखी वाढणार

follow us
  • fb
  • instagram
  • youtube