‘नाचा दणाना’वर थिरकणार महाराष्ट्र! ‘सुपर डुपर’मधील जल्लोषमय गाणे प्रदर्शित

Super Duper : मराठी चित्रपटसृष्टीत सध्या जोरदार चर्चेत असलेल्या ‘सुपर डुपर’ या आगामी चित्रपटातील ‘नाचा दणाना’ हे गाणे प्रदर्शित होताच चांगलेच

  • Written By: Published:
Super Duper

Super Duper : मराठी चित्रपटसृष्टीत सध्या जोरदार चर्चेत असलेल्या ‘सुपर डुपर’ या आगामी चित्रपटातील ‘नाचा दणाना’ हे गाणे प्रदर्शित होताच चांगलेच व्हायरल होत आहे. हळदीचे हे गाणे धमाल संगीत, भव्य सजावट आणि उत्साहाने भरलेल्या सादरीकरणामुळे पाहाताक्षणीच थिरकायला भाग पडणारे आहे. यात ललित प्रभाकर आणि विदुला चौगुले यांची जोडी विशेष उठून दिसत आहे तर त्यांच्या जोडीला ज्येष्ठ अभिनेत्री निर्मिती सावंत, शशांक शेंडे, हृषिकेश जोशी, नम्रता संभेराव, कुशल बद्रिके आणि प्रतीक्षा कोते या जबरदस्त कलाकारांचा जल्लोष अधिकच रंगत आणत आहे. समीर आशा पाटील, यांचे बोल लाभलेल्या या गाण्याला अभिनव जगताप यांचे उत्स्फूर्त संगीत लाभले आहे. तर आदर्श शिंदे आणि आनंदी जोशी यांच्या आवाजाने या गाण्यात अफलातून एनर्जी आणली आहे.

कौटुंबिक महासोहळा अशी या चित्रपटाची टॅगलाईन असल्याने नाचा दणाना’मध्ये संपूर्ण कुटुंबाचा जल्लोष पाहायला मिळतोय. गाण्यात घरातील प्रत्येक सदस्य एकत्र येऊन आनंद साजरा करताना दिसतो. कुटुंबातील बॅाण्डिंग, एकमेकांवरील प्रेम आणि एकत्र येण्याचा उत्साह या गाण्यातून सुंदरपणे उलगडतो. त्यामुळेच चित्रपटाच्या नावाप्रमाणे हे गाणेही ‘सुपर डुपर’ हिट ठरण्याच्या मार्गावर आहे.

प्रत्येक कलाकाराची ऊर्जा, नृत्य आणि रंगतदार वेशभूषा यामुळे हे गाणे अधिकच आकर्षक बनले आहे. विशेष म्हणजे, या गाण्यातील हुक स्टेप इतकी भन्नाट आहे की, ती लवकरच ट्रेंडिंग होणार, याची चाहत्यांना खात्री आहे. लग्नसमारंभात ‘नाचा दणाना’वर नाचल्याशिवाय कार्यक्रम पूर्णच होणार नाही, असे चित्र सध्या हे गाणे पाहून दिसतेय.

चित्रपटाचे दिग्दर्शक समीर आशा पाटील म्हणतात, ‘’ ‘नाचा दणाना’ हे गाणे चित्रपटातील एक खास क्षण साजरा करते. नात्यांमधला आनंद, उत्साह आणि एकत्र येण्याची भावना या गाण्यातून अधोरेखित होते. कथा ज्या उंचीवर पोहोचते, त्या क्षणाला साजेशी ऊर्जा आम्ही या गाण्यातून व्यक्त करण्याचा प्रयत्न केला आहे. प्रेक्षकांना हे गाणे नक्की आवडेल, याची मला खात्री आहे.”

कौटुंबिक समस्या अन् आर्थिक अडचण; पायलट सुमित कपूरवर रोहित पवारांचा सर्वात मोठा खुलासा

झी स्टुडिओजची प्रस्तुत, नाईंटी नाईन प्रॉडक्शन्स तथा सिद्धिविनायक प्रॉडक्शन्सची निर्मित आणि समीर आशा पाटील दिग्दर्शित ‘सुपर डुपर‘चा हा कौटुंबिक महासोहळा येत्या 3 एप्रिल रोजी रंगणार आहे. या चित्रपटाचे विजय शिंदे आणि नरेश बोर्डे निर्माते आहेत. तर उमेश कुमार बन्सल, बवेश जानवलेकर प्रस्तुतकर्ता आहेत.

follow us