TDM Marathi Movie: टीडीएम सिनेमासाठी सुप्रिया सुळेंची खास पोस्ट चर्चेत; म्हणाल्या, ‘दादांनी आणि मी…’

TDM Marathi Movie: टीडीएम सिनेमासाठी सुप्रिया सुळेंची खास पोस्ट चर्चेत; म्हणाल्या, ‘दादांनी आणि मी…’

TDM Marathi Movie: दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे (Bhaurao Karhade) यांचा ‘टीडीएम’ (TDM) हा सिनेमा गेल्या काही दिवसांपासून जोरदार चर्चेत आहे. हा सिनेमा 28 एप्रिल 2023 रोजी सिनेमागृहामध्ये प्रदर्शित झाला आहे. सिनेमाला थिएटरमध्ये शो मिळत नसल्याने या सिनेमाचे (Cinema) थिएटमधील प्रदर्शन थांबवण्याचा निर्णय भाऊराव कऱ्हाडे यांनी घेतला होता. आता हा सिनेमा पुन्हा एकदा रिलीज (Movie release) करण्यात येणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Supriya Sule (@supriyasule)


9 जून रोजी हा सिनेमा चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमासाठी नुकतीच सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी एक खास पोस्ट सोशल मीडियावर (Social media) शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी ‘टीडीएम’ हा सिनेमा बघण्याचे आवाहन चाहत्यांना  केले आहे. सुप्रिया सुळे यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत दिसत आहे की, सुप्रिया सुळे या म्हणतात की, आज इंदापूरला आल्यावर ऋषी मला भेटला, ऋषीनी टीडीएम नावाच्या सिनेमामध्ये काम केलं आहे.

दादांनी आणि मी हा सिनेमा बघितला. तुम्ही कधी बघणार? नक्की हा सिनेमा बघा, तुम्हाला नक्की आवडणार असे यावेळी सुप्रिया सुळे यांनी सांगितले आहे. सुप्रिया सुळे यांनी या व्हिडीओला कॅप्शन देखील दिले आहे. आपल्याला बारामती लोकसभा मतदारसंघातील इंदापूर तालुक्याचे सुपुत्र आणि विद्या प्रतिष्ठानचे माजी विद्यार्थी ऋषि विलास काळे यांची भेट घेतली आहे. ऋषी लवकरच राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांच्या टिडीएम या सिनेमातून मोठ्या पडद्यावर पदार्पण करणार आहे.

Bal Shivaji: आकाश ठोसर साकारणार ‘बाल शिवाजी’, राज्याभिषेकाच्या ३५०व्या जयंती निमित्त सिनेमाचा फर्स्ट लूक प्रदर्शित 

भेटीच्या दरम्यान त्याचा कलाक्षेत्रात प्रवास जाणून घेऊन त्याचे अभिनंदन केले आहे. त्याला 9 जून रोजी प्रदर्शित होणाऱ्या सिनेमासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. आपण देखील सर्वांनी हा सिनेमा नक्की पहा! टीडीएम सिनेमाला थिएटरमध्ये शो मिळत नसल्याने या सिनेमातील कलाकार भावूक झाले होते. त्यावेळी अजित पवार यांनी या सिनेमाबद्दल एक ट्वीट शेअर केले होते.

या ट्वीटमध्ये त्यांनी लिहिले आहे की, ‘राष्ट्रीय पुरस्कार विजेते, सिनेमा दिग्दर्शक भाऊसाहेब कऱ्हाडे यांच्या टिडीएम या सिनेमाला थिएटरमध्ये स्क्रीन न मिळणं अत्यंत दुर्दैवी आहे. संबंधितांनी या सिनेमाला प्राईम टाईम स्लॉटमध्ये लवकरात लवकर स्क्रिन उपलब्ध करुन द्यावी, अशा प्रकारचे ट्विट विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी केले होते.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • twitter
  • youtube