मतदान ड्युटीवर पोलिंग एजंट असतानाच मृत्यू; टॉयलेटमध्ये बेशुद्ध अवस्थेत सापडले मनोहर नलगे
Polling Agent Manohar Nalage Dead at duty found unconscious in toilet : देशभरात आज पाचव्या टप्प्यात तर राज्यात अंतिम टप्प्यातील लोकसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडलं. त्यावेळी मुंबईतील एका मतदान केंद्रावर ड्युटी ( duty ) करत असताना पोलिंग एजंट मनोहर नलगे ( Manohar Nalage ) यांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान आज मुंबईमध्ये सहा मतदारसंघांसाठी मतदान पार पडलं. मात्र यावेळी अनेक मतदार केंद्रावर निवडणूक आयोगाकडून कोणत्याही प्रकारची व्यवस्था नसणे, त्याचबरोबर बिघाड होणे, अशा प्रकारच्या अनेक समस्यांना पोलिंग एजंटसह नागरिकांना सामोरे जावं लागलं.
Loksabha Election : ठाकरेंकडून दिशाभूल, आचारसंहितेचं उल्लंघन; शेलारांची EC कडे तक्रार
तर नलगे यांच्याबद्दल सांगायचं झालं तर मनोहर नलगे ज्या मतदान केंद्रावर कर्तव्य बजावत होते. तेथे सहा वाजायला 10 मिनिटं असताना तो वॉशरुमला गेले होते. याच दरम्यान मतदान पेट्या बंद केल्यानंतर पोलिंग एजंटची सही घ्यावी लागते. त्या सही त्यांची विचारणा करण्यात आली. मात्र अद्याप देखील ते वॉशरुमहून परतले नव्हते.
त्यावेळी ते तिथे मतदान केंद्रावर दिसत नसल्याने शोधाशोध करण्यात आली. त्यावेळी तो टॉयलेटमध्ये बेशुद्ध अवस्थेत सापडले. त्यानंतर त्यांना मुंबईतील केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र तेथे गेल्यावर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. नलगे यांचं वय वर्षे 62 होतं. म्हसकर उद्यान, बी डी डी चाळ ना म जोशी मार्ग, डिलाईल रोड मुंबई 13 येथील ते राहिवासी होते.
दरम्यान काही मतदान केंद्रावरून संथ गतीने मतदान होत आहे. तसंच, अचानक काही अडचण आली म्हणून मतदारांना वेठीस धरलं जात आहे. त्याची दखल घेत उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेऊन कारवाईची मागणी केली आहे. पत्रकार परिषदेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी जाणूनबुजून काही ठिकाणी अडचणी निर्माण केल्या जात आहेत. तसंच, आमच्या लोकांना अडचणी निर्माण केल्या जात आहेत. असा थेट आरोप केला आहे. तसंच, याबाबत योग्य ती खबरदारी निवडणूक अधिकाऱ्यांकडून घेतली नाही तर आपण न्यायालयात जाऊ असा थेट इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. तसंच, येथून अनेक लोकांचे आपल्याला अडचण येत आहे अशा प्रकारचे फोन आपल्याला आले आहेत असंही ठाकरे यावेळी म्हणाले आहेत.