उद्या प्रेक्षकांच्या भेटीला येणार बहुप्रतिक्षित Gadar 2 चित्रपटातील दुसरं गाणं…

उद्या प्रेक्षकांच्या भेटीला येणार बहुप्रतिक्षित Gadar 2 चित्रपटातील दुसरं गाणं…

Gadar 2 Khairiyat Teaser : दोन दशकांपूर्वी प्रदर्शित झालेला (Gadar ) ‘गदर: एक प्रेम कथा’ (Gadar 2 Teaser) हा सिनेमा बॉक्स ऑफिस वर सुपर डुपर हिट झाला होता. सिनेमाचा सिक्वेल असणारा ‘द कथा कंटिन्यूज:गदर 2’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सिनेमा मुख्य भूमिका साकारणारा अभिनेता सनी देवल (Sunny Dewal) आणि अभिनेत्री अमिषा पटेल (Amisha Patel) यांची जोडी पुन्हा एकदा मोठा पडद्यावर पाहायला मिळणार आहे. त्यात आता या चित्रपटातील दुसरं गाणं रिलीज करण्यात येणार आहे. त्यापूर्वी त्याचा टीझर रिलीज करण्यात आला आहे. ( Teaser Release of Gadar 2 Khairiyat Song )

परराष्ट्र मंत्री एस जयशंकर, डेरेक ओब्रायन यांच्यासह राज्यसभेच्या 11 जागा बिनविरोध, भाजप बहूमतापासून दूरच

या चित्रपटातील दुसरं गाणं रिलीज करण्यात येणार आहे. अशी पोस्ट दिग्दर्शक अनिल शर्मा यांनी केली आहे. त्यांनी या पोस्टमध्ये सांगितलं की, सगळीकडे व्हायरलं पसरलं आहे. वातावरण बदललेलं आहे. त्यामुळे सर्वांच्या कल्याणासाठी देवाकडे पार्थना करत आहे. लवकरच भेटू… तर या गाण्याबद्दल सांगायचं झालं तर हे गाणं प्रसिद्ध गायक अरिजीत सिंग आणि मिथूनने गायलं आहे. तर हे गाणं मॉन्टी शर्मा यांनी या गाण्याला संगीत दिलं आहे. सईद काद्री यांनी हे गाणं लिहिलं आहे. उद्या मंगळवारी 18 जुलैला हे गाणं प्रक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Jawan Film Poster: नयनताराचा जवानमधील किलर लूक; पोस्टर पाहून चाहत्यांची वाढली उत्सुकता

दरम्यान गेल्या काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा टिझर रिलीज करण्यात आला आहे. ‘गदर २’ हा सिनेमा मागच्या अनेक महिन्यांपासून चर्चेत असणाऱ्या गदर टू या सिनेमाबद्दलच्या अपडेट्स, दरम्यान चे फोटोज आणि व्हिडिओज सातत्याने व्हायरल होत होते. त्यामुळे प्रेक्षकांची टीझर पाहण्याची उत्सुकता शिगेला पोचली होती. रिलीज केलेल्या टीझरमध्ये सनी देओलचा डायलॉग सध्या सोशल मीडियामध्ये ट्रेंड झाला. या डायलॉगमध्ये एक महिला म्हणते की, ‘तो पाकिस्तानचा जावई आहे, त्याला नारळ द्या, टिळा लावा, नाहीतर तो हुंड्यासाठी लाहोरला घेऊन जाईल…!’

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube