Pathaan X Tiger चा टीझर आला, शाहरूख-सलमानच्या अ‍ॅक्शन्सची प्रेक्षकांना भूरळ!

Pathaan X Tiger चा टीझर आला, शाहरूख-सलमानच्या अ‍ॅक्शन्सची प्रेक्षकांना भूरळ!

Teaser Release of Pathaan X Tiger : यशराज फिल्मचा नुकताच येऊन गेलेला चित्रपट पठानने बॉक्स ऑफिसवर रिकॉर्ड तोड कलेक्शन केल. हिंदी चित्रपटातील आता पर्यंचा सर्वांत जास्त कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. सिद्धार्थ आनंद यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केले आहे. तर हाआदित्य चोप्रा यांचा महत्वाकांक्षी स्पाय यूनिव्हर्स होता.

यामध्ये सुपरस्टार शाहरुख खान, दीपिका पादुकोण आणि जॉन अब्राहमने मुख्य भूमिका साकराल्या आहेत. तसेच यामध्ये शाहरुख आणि सलमान खान यांचं शानदार रीयुनियनही पाहायला मिळालं. या चित्रपटाच्या यशानंतर आता यशराज फिल्म्सने पठान एक्स टायगरचा धमाकेदार टीजर रिलीज केला आहे.

या टीझरमधील म्युझिकने प्रेक्षकंच्या अंगावर काटा आणला आहे. तर शाहरूख आणि सलमान यामध्ये जबरदस्त अॅक्शन करताना दिसले आहेत. त्यामुळे चाहत्यांची उत्सुकता प्रचंड वाढली आहे. या टीझरसह थीम सॉन्ग देखील रिलीज करण्याचत आले आहे. तर विशाल-शेखर यांनी हे थीम सॉन्ग कम्पोज केलं आहे.

Tujhi Majhi Jodi Jamli Song From Phakaat: मूड ऑन करणारे ‘फकाट’मधील तुझी माझी जोडी’ प्रेमगीत प्रेक्षकांच्या भेटीला

YRF चा एक था टायगर हा पहिला स्पाई युनिव्हर्स स्पाई थ्रिलर होता जो 2012 मध्ये रिलीज झाला होता. त्यांनंतर 2017 ला त्याचा पुढचा भाग आला. ज्याचं नाव टायगर जिंदा हैं असं होत. त्यामध्ये 2012 ला रिलीज झालेला वॉर देखील एक स्पाय थ्रिलर चित्रपट होता. एक विषेश म्हणजे हे सर्व चित्रपट
ब्लॉकबस्टर आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube