शबाना आझमी, अनुपम खेर, जुही बब्बर आणि सुप्रिया पाठक यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘द ड्रामा उत्सव मुंबई 2026’चे आयोजन

The Drama Utsav Mumbai 2026 हा महोत्सव 18 ते 29 नोव्हेंबर दरम्यान मुंबईतील सेंट अँड्र्यूज ऑडिटोरियम येथे पार पडणार आहे.

The Drama Utsav Mumbai 2026 हा महोत्सव 18 ते 29 नोव्हेंबर दरम्यान मुंबईतील सेंट अँड्र्यूज ऑडिटोरियम येथे पार पडणार आहे.

The Drama Utsav Mumbai 2026: भारतीय नाटकांची विविधता आणि समृद्धी साजरी करण्यासाठी, ‘आयडियाज एंटरटेनमेंट’ (Ideas Entertainment) आणि ‘बुकमायशो’ (BookMyShow) जे या महोत्सवाचे अधिकृत तिकीट भागीदार आहेत. यांच्या संयुक्त विद्यमाने ‘द ड्रामा उत्सव मुंबई 2026’चे आयोजन करण्यात आले आहे. 12 दिवस चालणाऱ्या या महोत्सवात हिंदी, इंग्रजी, मराठी, गुजराती आणि बंगाली अशा पाच भाषांमधील 15 नाटके सादर केली जाणार आहेत. 18 ते 29 नोव्हेंबर दरम्यान वांद्रे (पश्चिम) येथील सेंट अँड्र्यूज ऑडिटोरियममध्ये होणारा हा महोत्सव, प्रस्थापित कलाकार, नामांकित नाट्यसंस्था आणि उदयोन्मुख प्रतिभांना एकाच व्यासपीठावर आणणार आहे.

‘मान’ मधून उमटणार स्त्रीशक्तीचा सामूहिक हुंकार; 4 जूनला चित्रपट होणार प्रदर्शित

या महोत्सवात अनेक दिग्गज कलाकार सहभागी होत आहेत. यामध्ये ‘ब्रोकन इमेजेस’ (Broken Images) मध्ये शबाना आझमी, ‘कुछ भी हो सकता है’ (Kuch Bhi Ho Sakta Hai) मध्ये अनुपम खेर, ‘ऑटोबायोग्राफी’ (Autobiography) मध्ये लिलेट दुबे, ‘पियानो’ (Piano) मध्ये रघुबीर यादव, ‘ताजमहल का टेंडर’ (Taj Mahal Ka Tender) मध्ये राकेश बेदी, ‘द सिद्धूस ऑफ अप्पर जुहू’ (The Siddhus of Upper Juhu) मध्ये रजित कपूर, तर ‘करमजले ब्रदर्स’ (Karamjale Brothers) मध्ये विनय पाठक आणि रजत कपूर यांचा समावेश आहे. प्रादेशिक नाटकांच्या विभागात अर्पिता चॅटर्जी, अमी त्रिवेदी, सिद्धार्थ जाधव, दिलीप प्रभावळकर आणि विजय केंकरे यांसारख्या कलाकारांचा सहभाग असेल. महोत्सवाची सुरुवात ‘सिल्ुएट्स’ (Silhouettes) या नाटकाने होईल, ज्यामध्ये दिव्या सेठ आणि अमोल पालेकर (विशेष उपस्थिती) दिसतील. तसेच, ‘फेअरवेल’ (Farewall) या नाटकाद्वारे उदयोन्मुख कलाकारांनाही एक व्यासपीठ उपलब्ध करून दिले जाणार आहे.

माझं नाव छाया कदम आहे! मराठी चित्रपट महोत्सव चित्रपताकामध्ये दोन छाया कदमांची हृदयस्पर्शी भेट…

या महोत्सवातील दोन विशेष आकर्षणे म्हणजे, 28 नोव्हेंबर रोजी होणारा जुही बब्बर यांच्या ‘एक लम्हा: लव्ह स्टोरी’ (Ek Lamha: Love Story) या नाटकाचा 50 वा विशेष प्रयोग आणि 29 नोव्हेंबर रोजी होणारा महोत्सवाचा समारोप, ज्यामध्ये सुप्रिया पाठक अभिनीत ‘जाने से पहले’ (Jaane Se Pahale) या नाटकाचा प्रीमियर सादर केला जाईल. या उपक्रमाबद्दल बोलताना ‘द ड्रामा उत्सव’चे क्युरेटर आणि जनक, परितोष पेंटर म्हणाले, “आमचे ध्येय विविध भाषांमधील नाट्यसृष्टीला एका व्यासपीठावर आणणे आणि भारतीय कथाकथनातील समृद्धी व विविधतेचा उत्सव साजरा करणे हे आहे. ‘द ड्रामा उत्सव’चा उद्देश कलाकार, प्रेक्षक आणि समुदायांना एकमेकांच्या जवळ आणणे, तसेच अधिकाधिक लोकांना थेट नाट्यप्रयोगांच्या जादूचा अनुभव घेण्यासाठी प्रोत्साहित करणे हा आहे.

‘द ड्रामा उत्सव’ बद्दल

‘द ड्रामा उत्सव’ हा एक बहुभाषिक नाट्य महोत्सव आहे, जो भारतीय नाट्यपरंपरेचा गौरव करण्यासाठी, तिला प्रोत्साहन देण्यासाठी आणि जतन करण्यासाठी एक व्यासपीठ म्हणून सुरू करण्यात आला आहे. ‘आयडियाज एंटरटेनमेंट’ (Ideas Entertainment) द्वारे आयोजित हा महोत्सव विविध भाषिक आणि सांस्कृतिक पार्श्वभूमी असलेल्या कलाकारांना, नाटककारांना, दिग्दर्शकांना आणि नाट्यप्रेमींना एकत्र आणण्याचा प्रयत्न करतो.

‘तू आहेस ना’मधून सुप्रिया पिळगावकर आणि सिद्धार्थ बोडके एकत्र; लव्ह फिल्म्सकडून फर्स्ट लूकचे अनावरण

प्रसिद्ध कलाकारांच्या सादरीकरणासोबतच प्रभावी नाट्यकृती सादर करून, ‘द ड्रामा उत्सव’ एक असे शाश्वत सांस्कृतिक व्यासपीठ निर्माण करू इच्छितो, जिथे कथा भाषांच्या आणि पिढ्यांच्या सीमा ओलांडून पोहोचू शकतील.

‘द ड्रामा उत्सव मुंबई 2026’ ची तिकिटे केवळ ‘बुकमायशो’ (BookMyShow) वर उपलब्ध असतील.

follow us