The Kerala Story वरून वाद; चित्रपटातील दावे सिद्ध करणाऱ्याला मुस्लिम संघटनेकडून 1 कोटीचे बक्षीस जाहीर
The Kerala Story: ‘द केरळ स्टोरी’ (The Kerala Story) या सिनेमावरून सध्या सुरू झालेला वाद आता वाढत चालला आहे. ‘द केरळ स्टोरी’ या सिनेमावर काँग्रेस खासदार शशी थरूर (Congress MP Shashi Tharoor) यांनी आक्षेप घेतला होता. ते म्हणाले की, ही तुमच्या केरळची गोष्ट असू शकतात, पण ती आमच्या केरळची गोष्ट नाही. आता ‘द केरळ स्टोरी’ या सिनेमाच्या ट्रेलरमध्ये (Movie trailers) करण्यात आलेल्या दाव्यांवरून खूपच गदारोळ निर्माण झाला आहे.
सिनेमा प्रदर्शित होण्याअगोदर मुस्लिम युथ लीग या संघटनेच्या केरळ राज्य समितीने सिनेमात दाखवण्यात आलेले दावे करण्यात आलेले आरोप सिद्ध करणाऱ्याला १ कोटी रुपयांचे बक्षीस देणार असल्याचे म्हटले आहे. तर दुसरीकडे, अभिनेता आणि वकील सी शुक्कूर यांनी देखील सिनेमातील दावे फेटाळून लावले आणि म्हटले की, ३२ हजारांऐवजी अवघ्या ३२ महिलांची नावे आणि पत्ते देऊन या महिला आयएसमध्ये सामील झाल्याचे कोणी सिद्ध केले, तर ते त्याला ११ लाखांचे बक्षीस देण्यात येणार आहे.
Now there’s an opportunity for all those hyping the alleged conversions of 32,000 women on Kerala to Islamism — to prove their case and make some money. Will they be up to the challenge or is there simply no proof because none exists? #NotOurKeralaStory pic.twitter.com/SrwaMx556H
— Shashi Tharoor (@ShashiTharoor) May 1, 2023
सिनेमाच्या रिलीज झालेल्या ट्रेलरमध्येच मोठा दावा करण्यात आला आहे की, केरळमधील ३२ हजार महिलांनी इस्लाम धर्म स्वीकारला आणि इस्लामिक स्टेट (IS) मध्ये सामील करण्यात आल्या आहेत. या सिनेमावरून राजकीय वाद निर्माण झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार मुस्लिम यूथ लीगच्या केरळ राज्य समितीने सांगितले आहे की, 4 मे रोजी केरळच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये संकलन केंद्रे उघडली जाणार आहेत, आणि जो कोणी सिनेमातील आरोप सिद्ध करणार आहेत, त्याला १ कोटी रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे.
या संकलन केंद्रांमध्ये कोणीही तपशील टाकू शकणार आहे. समितीच्या पोस्टरमध्ये सांगण्यात आले आहे की, 32 हजार केरळी लोकांनी धर्मांतर करून सीरियात पलायन केल्याचे आरोप सिद्ध करण्याचे आव्हान स्वीकारा आणि पुरावे सादर करा. शिवाय, केरळ अभिनेता आणि वकील सी शुक्कूर यांनी फेसबुक पोस्टमध्ये लिहिले आहे की, सिनेमाचा ट्रेलर ३२ हजार महिलांचे धर्मांतर आणि इस्लामिक स्टेटमध्ये सामील होण्याबद्दल सांगितले आहे. यापैकी ३२ महिलांचे पुरावे कोणी आणल्यास त्याला ११ लाख रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे.
ते पुढे म्हणाले की, ‘लव्ह जिहाद’ प्रकरणाविषयी कोणताही पुरावा नसताना एखाद्या समाजाला आणि राज्याला दोष देणे थांबवले पाहिजे. याअगोदर देखील केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी ‘द केरळ स्टोरी’ या सिनेमावर टीका केली होती. केरळला बदनाम करण्यासाठी आणि जातीय आधारावर राज्याचे विभाजन करण्यासाठी हा सिनेमा बनवण्यात आल्याचे विजयन म्हणाले होते.
Wrestlers Protest: कुस्तीपटूंना अभिनेत्री उर्मिला मातोंडकरचे समर्थन, मदत करण्याची केली विनंती
विजयन म्हणाले की, अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे खोटे बोलणे, कोणत्याही क्षेत्राला सांप्रदायिक म्हणून लेबल करणे आणि लोकांमध्ये फूट पाडण्याचा परवाना नाही. दरम्यान, केरळ स्टोरी सिनेमाच्या ट्रेलरमध्ये हिंदू मुलींचे कथित ब्रेनवॉश, धर्मांतर आणि नंतर इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेद्वारे भरती करून अफगाणिस्तान आणि सीरियासारख्या ठिकाणी पाठवले जात असल्याचे दाखवले आहे. ट्रेलरनुसार 32 हजार हिंदू मुलींचे धर्मांतर करून त्यांना आयएसच्या तळांवर नेण्यात आले आहे.