‘सहलीला जायाचा..जायाचा सहलीला!’ म्हणत झी मराठी अवॉर्ड्स 2026 चा रंगला नामांकन सोहळा

‘सहलीला जायाचा..जायाचा सहलीला!’ थीमवर झालेल्या सोहळ्यात झी मराठी कलाकारांनी आपल्या हटके आणि स्टायलिश अंदाजाने रेड कार्पेटवर रंगत आणली.

  • Vishal Aarde
  • Written By: Published:
Untitled Design   2026 10 22T182417.328

The nomination ceremony for the Zee Marathi Awards 2026 took place : कलाकारांच्या मेहनतीचा आणि त्यांच्या लोकप्रियतेचा गौरव करणारा ‘झी मराठी अवॉर्ड्स 2026’ हा छोट्या पडद्यावरील एक मानाचा सोहळा आहे. दरवर्षी प्रमाणे यावर्षीही या पुरस्कार सोहळ्याची कलाकारांसोबतच प्रेक्षकही आतुरतेने वाट पाहत आहेत. यंदाच्या ‘झी मराठी अवॉर्ड्स 2026’ च्या नामांकन सोहळ्यातही हीच उत्सुकता, उत्साह आणि जल्लोष पाहायला मिळाला. ‘सहलीला जायाचा..जायाचा सहलीला!’ या थीमवर झालेल्या या सोहळ्यात झी मराठी परिवारातील कलाकारांनी आपल्या हटके आणि स्टायलिश अंदाजाने रेड कार्पेटवर रंगत आणली.

यंदाच्या थीमला साजेसा फुलांचा बहर, पेस्टल रंग आणि फ्रेश लूक्स असा कलाकारांचा अंदाज पाहायला मिळाला. अनेक कलाकारांनी आपल्या लूकमध्ये खास प्रयोग करत स्वतःची क्रिएटिव्हिटी दाखवली. काहींनी खास डिझाइन केलेले पोशाख परिधान केले, तर काही कलाकारांनी हटके अॅक्सेसरीजने आपला लूक उठावदार केला. ‘वीण दोघांतली ही तुटेना’ मधील तेजश्री प्रधान म्हणजेच स्वानंदीने सुंदर साडीतील एलिगंट अंदाजात उपस्थिती लावली. तर केतकी कुलकर्णीच्या फ्लोरल बास्केट ने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

500 कोटींच्या कथित ऑडिओ क्लिपवरून सुषमा अंधारेंचा भाजप-शिंदेंवर निशाणा, गृहखात्याच्या चौकशीची मागणी

मालिकांमध्ये वेगवेगळ्या भूमिकांमध्ये दिसणारे कलाकार या दिवशी मात्र आपल्या ग्लॅमरस रूपात पाहायला मिळाले. ‘कमळी’ मधील अन्नपूर्णा आज्जी आणि कामिनी, हर्षदा खानविलकर (लक्ष्मी) यांनी मॉडर्न लूकमध्ये रेड कार्पेटवर एंट्री घेतली, तर अदिती सारंगधर (तेजस्विनी खानोलकर), अभिज्ञा भावे (कौशिकी) यांचा कूल अंदाज चर्चेचा विषय ठरला. दिव्या पुगावकर (जान्हवी), पूर्वा कौशिक (ज्योती), चिन्मयी साळवी (शर्वरी) यांनी ऑफ-शोल्डर गाऊनमध्ये तर अक्षया देवधर (भावना), प्राप्ती रेडकर (सावली), शिवानी सोनार (तारिणी) यांनी आकर्षक वेस्टर्न ड्रेसमध्ये आपला लूक केला. मुलांनीही मागे न राहता फ्लोरल शर्ट्स, जॅकेट्स आणि स्मार्ट कॅज्युअल लूक्समध्ये रेड कार्पेटवर आपली स्टाईल दाखवली.

या सोहळ्याच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी मृण्मयी देशपांडे आणि गौतमी देशपांडे यांनी सांभाळली. दोघींनी आपल्या मजेशीर अंदाजाने कलाकारांशी संवाद साधत त्यांच्या सहलीच्या आठवणीही जाणून घेतल्या. कलाकारांनी एकमेकांसोबतच्या मजेशीर आठवणी सांगत या सोहळ्याला आणखी रंगत आणली. यानंतर झी मराठी परिवारातील कलाकारांनी खास रॅम्प वॉक करत आपले लूक्स सादर केले. नामांकन मिळालेल्या कलाकारांना मंचावर बोलावून त्यांना मानाचे पदक देण्यात आले. या पदकाने आगामी पुरस्कार सोहळ्याची उत्सुकता आणखी वाढली.

IND vs NZ : भारताचा विक्रमी धावांचा पाठलाग ! न्यूझीलंडला धूळ चारली; नमन धीरची मॅच विनिंग खेळी

आता नजर लागली आहे ती झी मराठी अवॉर्ड्स 2026 च्या अंतिम पुरस्कार सोहळ्याकडे. कोण ठरणार यंदाचा विजेता? कोणाच्या मेहनतीला मिळणार प्रेक्षकांची पसंती? चला, पाहूया यंदाची बहुप्रतीक्षित झी मराठी अवॉर्ड्स 2026 नामांकन !

सर्वोत्कृष्ट कथाबाह्य कार्यक्रम
वेध भविष्याचा
आम्ही सारे खवैय्ये
होम मिनिस्टर
सारेगमप

सर्वोत्कृष्ट मालिका
तारिणी
कमळी
सनई चौघडे
दीप ज्योती
वीण दोघांतली ही तुटेना
कृष्णाईच्या लेकी
लक्ष्मी निवास
सावळ्याची जणू सावली

सर्वोत्कृष्ट जोडी
जय-शर्वरी(सनई चौघडे)
केदार-तारिणी(तारिणी)
हृषी-कमळी (कमळी)
दीप-ज्योती (दीपज्योती )
समर-स्वानंदी(वीण दोघांतली ही तुटेना)
शंकर-गौरी(कृष्णाईच्या लेकी )
सिद्धू-भावना(लक्ष्मी निवास)
सारंग-सावली (सावळ्याची जणू सावली )

सर्वोत्कृष्ट नायिका
तारिणी(तारिणी)
कमळी (कमळी)
शर्वरी(सनई चौघडे)
ज्योती (दीपज्योती )
स्वानंदी(वीण दोघांतली ही तुटेना)
गौरी (कृष्णाईच्या लेकी)
जान्हवी (लक्ष्मी निवास)
भावना (लक्ष्मी निवास)
सावली (सावळ्याची जणू सावली )

सर्वोत्कृष्ट नायक
सारंग (सावळ्याची जणू सावली )
सिद्धू (लक्ष्मी निवास)
शंकर (कृष्णाईच्या लेकी )
समर (वीण दोघांतली ही तुटेना)
दीप (दीपज्योती )
जय (सनई चौघडे)
हृषी (कमळी)
केदार (तारिणी)

सर्वोत्कृष्ट खलनायिका
भैरवी (सावळ्याची जणू सावली )
इंदुराणी (कृष्णाईच्या लेकी)
मल्लिका (वीण दोघांतली ही तुटेना)
प्रीती (दीपज्योती)
कामिनी (कमळी)
पद्मिनी (तारिणी)

सर्वोत्कृष्ट खलनायक
राजकुमार (सावळ्याची जणू सावली)
जयंत (लक्ष्मी निवास)
अंशुमन (वीण दोघांतली ही तुटेना)
युवराज (तारिणी)

सर्वोत्कृष्ट बालकलाकार
अबीर (सावळ्याची जणू सावली)
ओवी (सावळ्याची जणू सावली)
शुभ्रा (सावळ्याची जणू सावली)
रमा (लक्ष्मी निवास)
आरव (लक्ष्मी निवास)
इरा (तारिणी)

सर्वोत्कृष्ट सूत्रसंचालन
संकर्षण कऱ्हाडे(आम्ही सारे खवैय्ये)
मृण्मयी देशपांडे (सारेगमप)
अतुल भगरे (वेध भविष्याचा)

तेव्हा बघायला विसरू नका ‘झी मराठी अवॉर्ड्स 2026’ नामांकन सोहळा 25 ऑक्टोबर, रविवार संध्या 7:00 वा सदैव तुमच्या झी मराठी वाहिनी वर

follow us