Chiranjeev Perfect Badhalai : ‘चिरंजीव परफेक्ट बिघडलाय’ नाटकाला रसिक प्रेक्षकांची दाद

Chiranjeev Perfect Badhalai : रविवार 23 नोव्हेंबर रात्री 8. 30 वा. गडकरी रंगायतन, ठाणे येथील चिरंजीव परफेक्ट बिघडलाय

  • Written By: Published:
Chiranjeev Perfect Badhalai

Chiranjeev Perfect Badhalai : रविवार 23 नोव्हेंबर रात्री 8. 30 वा. गडकरी रंगायतन, ठाणे येथील चिरंजीव परफेक्ट बिघडलाय (Chiranjeev Perfect Badhalai) नाटकाच्या प्रयोगाला रसिक प्रेक्षकांचा जोरदार प्रतिसाद मिळाला. नाटकातील एका प्रसंगामध्ये कलाकार श्रेयस जोशी (Shreyas Joshi) आणि वैभव रंधवे (Vaibhav Randhawa) यांच्या जुगलबंदीला प्रेक्षकांनी वन्समोअर अशी दाद दिली.

दोघेही व्यावसायिक रंगभूमीवर नवीन असल्यामुळे त्यांना अश्या प्रकारची दाद मिळाल्यावर ते गोंधळून गेले त्यांना काय करावे ते क्षणभर कळले नाही, त्यांनी नाटक तसेच पुढे सुरू ठेवले.

रसिक प्रेक्षक नाटक संपल्यावर आत मेकरूम मध्ये त्यांना भेटायला आले. ‘चिरंजीव परफेक्ट बिघडलाय’ नाटकाच्या प्रयोगावर ते सगळेच खूप खूष होते आणि त्यांनी त्या दोघांना विनंती केली की, ‘या पुढील प्रयोगांमध्ये जर तुम्हाला तुमच्या गाण्यांना प्रेक्षकांनी वन्समोअर दिला तर तो तुम्ही नक्की घ्या’.

परदेशी थाटात खुललेली मराठी लव्हस्टोरी! ‘आसा मी अशी मी’चा ट्रेलर प्रदर्शित; ‘या’ दिवशी प्रेक्षकांच्या भेटीस येणार

तुम्ही तिघेही अतिशय छान कामं करत आहात. आम्हा प्रेक्षकांना तुमची ही फ्रेश लूक मधली कॉमेडी बघून खूप मज्जा आली. आम्ही हे नाटक खूप एन्जॉय केलं. त्यांनी नाटकातील कलाकारांना पुढील प्रयोगांना आणि त्यांच्या यशस्वी वाटचालीला शुभेच्छा ही दिल्या आणि नाटकातील कलाकारांबरोबर फोटो ही काढले.

भरत जाधव – महेश मांजरेकर पहिल्यांदाच झळकणार एकत्र; ‘शंकर जयकिशन’ लवकरच रंगभूमीवर!

follow us